अनेकदा शेतीमध्ये परवडत नसल्याचे म्हटले जाते. असे असताना मात्र अनेकजण चांगल्या प्रकारे शेती करून त्यामधून लाखो रुपये कमवतात. आता असेच काहीसे एका शेतकऱ्याने केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) संजय गंडाटे हे देखील सरकारी नोकरीच्या शोधात होते. असे असताना मात्र शेवटी यश न मिळाल्याने त्यांनी काहीतरी जरा हटके करण्याचा विचार केला, आणि यामध्ये त्यांना यश देखील मिळाले आहे.
नंतर त्यांनी मोत्यांची शेती (Pearl Farming Business) पर्ल फार्मिंग करण्यास सुरूवात केली. संजय यांनी उत्पादित केलेल्या मोतीला देशांतर्गत मोठी बाजारपेठ आहे, तसेच भारताबाहेर इटली, अमेरिका इत्यादी देशांमध्येही त्याच्या मोत्यांना मोठी मागणी आहे. यातून संजय यांना वर्षाला 10 लाख रुपयांची कमाई होते आहे. यामुळे ते यामध्ये यशस्वी झाले आहेत.
गेल्या 7 वर्षांपासून त्यांची मोत्यांची शेती सुरूच आहे. मोती कसा तयार होतो याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती. संजय यांनी काही वर्षे सरकारी शिक्षक बणण्यासाठी तयारी केली, पण निवड झाली नाही, तेव्हा कंपनीत नोकरी करण्यापेक्षा शेती उत्तम आहे आणि आधुनिक पद्धतीने काळाच्या ओघात बदल करून शेती करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी याबाबत तयारी केली.
त्यांना लहानपणापासूनच मोत्याची आवड आहे. गावाजवळ नदी असल्यामुळे संजय अनेकदा मित्रांसोबत शिंपले काढायला अनेकदा जात होते. त्यांच्या मनात विचार आला की गावातील नदीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या शिंपल्यापासून काही तयार करता येईल का? यानंतर त्यांनी जवळचे कृषी विज्ञान केंद्र गाठले. त्याठिकाणी त्यांना याबाबत सगळी माहिती मिळाली.
त्यांना समजले की या शंखांच्या मदतीने मोती बनवता येतात. त्यांनी नदीतून काही शिंपले आणले आणि भाड्याने तलाव घेऊन पर्ल फार्मिंग सुरू केले. मग त्याने बहुतेक संसाधने स्वतः विकसित केली. त्याला 10 हजार रुपय खर्च आला. त्यांना सुरुवातीला तोटा सहन करावा लागला. त्यांचे बहुतेक ऑयस्टर किंवा शिंपले मरण पावले. मात्र त्यांनी हे सुरूच ठेवले, हार मानली नाही आणि त्याने आपला विचार देखील बदलला नाही. इंटरनेटचा वापर करून त्यांनी माहिती गोळा केली.
संजय मोती 1200 रुपये प्रति कॅरेट दराने विकत आहेत. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून याची जाहिरात केली आहे, अनेकजण ऑनलाइन खरेदी देखील करत आहेत. यामुळे त्यांची उलाढाल वाढली आहे. अनेक लोक फोनवरूनही ऑर्डर देतात. त्यानंतर संजय त्यांना कुरिअरद्वारे मोती पाठवतो, यामुळे हा व्यवसाय आता वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या;
आनंदाची बातमी! एक मे नंतर गाळप होणाऱ्या उसाबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मित्रांनो गोड आंबा कसा ओळखावा? आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' टिप्स
भारतातलं पहिलं 'मधाचं गाव' महाराष्ट्रात, शेतकरी कमवतात लाखो रुपये, जाणून घ्या...
Share your comments