1. यशोगाथा

शेतकऱ्यांनो फक्त पिकवू नका विकाही! महिलांनी भाजीपाला विकून मिळवलेत तब्बल अडीच कोटी रुपये, घ्या जाणून

अनेक शेतकरी आपला भाजीपाला चांगल्या प्रकारे पिकतात, त्याचा दर्जा देखील चांगला असतो. तसेच उत्पादन देखील ते चांगल्या प्रकारे घेतात, असे असताना मात्र शेतकरी तोट्यातच आहेत. शेतकरी जरी त्याचा माल पिकवत असला तरी विक्री करताना त्याला व्यापारीच बाजारभाव देतात,

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar

farmar

अनेक शेतकरी आपला भाजीपाला चांगल्या प्रकारे पिकतात, त्याचा दर्जा देखील चांगला असतो. तसेच उत्पादन देखील ते चांगल्या प्रकारे घेतात, असे असताना मात्र शेतकरी तोट्यातच आहेत. शेतकरी जरी त्याचा माल पिकवत असला तरी विक्री करताना त्याला व्यापारीच बाजारभाव देतात, यामुळे तो मिळेल त्या भावाने विक्री करतो, मात्र स्वता जर विक्री केली तर यामधून शेतकरी चांगले पैसे कमवतात. स्वतःचा व्यवसाय सुरु करुन त्या व्यवसायाद्वारे नफा मिळवणे ही एक कला आहे. ही कला ज्याला जमते तो नक्कीच व्यवसाय क्षेत्रात चांगले पैसे कमवतो. यामुळे शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता असेच काहीसे झारखंड येथे काही महिलांनी केले आहे. यामधून त्यांनी चांगले पैसे कमवले आहेत. यामुळे सध्या त्यांची चर्चा आहे.

आता हजारीबाग झारखंड येथे चर्चू नारी ऊर्जा किसान उत्पदान कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. या कंपनीचे संचालक मंडळ पूर्णपणे महिलांचे आहे. म्हणजेच महिलाच ही कंपनी सांभाळत आहेत. यामध्ये कोणताही पुरुष हस्तक्षेप करत नाहीत. यामध्ये काही महिलांनी इतर महिलांना एकत्र आणून एक कंपनी स्थापन केली आणि त्यांना आपला माल बाजारात विकण्यासाठी प्रेरित केले. आता ही कंपनी करोडोंची झाली आहे. त्यांची करोडोंची उलाढाल यामधून होत आहे. भाजीपाला विकून त्यांनी ही कामगिरी केली आहे.

यामध्ये सध्या 7000 महिला काम करतात, तसेच हे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे, जे आज देशभरात पाहायला मिळते. महिलांना शेतीत काम करता यावे यासाठी गटातील लोकांना एकत्र करायचे आहे. असे चेअरमन सुमित्रा देवी यांनी म्हटले आहे. त्यांचे शिक्षण देखील फार असे झाले नाही. झारखंडमध्ये असे अनेक गट आहेत. एका गावातील 30 महिलांचा गटही सुमारे 10 एकर जमिनीवर सेंद्रिय शेती करत आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे. रासायनिक खतांप्रमाणे ही सेंद्रिय शेती यापासून मुक्त आहे आणि दीर्घकाळापर्यंत जमिनीची सुपीकताही वाढवते, असेही त्यांनी सांगितले आहे.

येथील 8750 हून अधिक महिला 'द्रवजीवामृत' वापरत आहेत. राज्यभरात सेंद्रिय खतांची विक्री करणारी 10 दुकाने आहेत. यामुळे अनेकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. सामुदायिक व्यवस्थापित शाश्वत शेतीद्वारे राज्यातील सुमारे 30,000 शेतकरी नैसर्गिक शेतीशी जोडले गेले आहेत. अशाप्रकारे राज्यातील महिलांचे उत्पन्नही वाढले असून ते त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे जर वेगळे प्रयोग केले तरच शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारेल.

English Summary: Farmers, don't just grow and sell! The women earned Rs. 2.5 crore by selling vegetables Published on: 31 January 2022, 11:02 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters