शेतकरी कुटुंब म्हटले म्हणजे अशिक्षित असे समजले जाते. बऱ्याचदा शेतकरी कुटुंबातील मुलं हे बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात असा ग्रह आहे.
परंतु गेल्या वर्षातील स्पर्धा परीक्षांचा मग ते एमपीएससी असो की यूपीएससीपरीक्षांचा निकालांचाएकदा मागोवा घेतला तर दिसून येते की शेतकऱ्यांची मुलं अव्वल ठरताना दिसत आहेत. तसे पाहायला गेले तर प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी शिकावं आणि फार मोठे बनावे नाव कमवावे. तसेच आता शेतकरी कुटुंबातील मुलं एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या परीक्षांना सहजतेने सामोरे जात आहेत. एवढेच नाही तर त्यामध्ये यशस्वी होताना देखील दिसत आहेत. या लेखात आपण अशाच एका शेतकरी कुटुंबातील एका तरुणाचा यशाचा वेध घेणार आहोत.
नक्की वाचा:शेतीसाठी 24 तास वीज असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी'
पीएसआय परीक्षेत शेतकऱ्याचा मुलगा राज्यात प्रथम
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चास या गावाचा निलेश बर्वे हा विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या यशाचा आनंद त्याच्या कुटुंबीयांनी व मित्रांनी खूप मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरा केला. जर निलेश बद्दल विचार करायचा झाला तर ते अगदी लहानपणापासून शाळेत हुशार होते व तेवढेच नाही तर स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मेकॅनिकल इंजिनियरिंग साठी ज्यांनी प्रवेश देखील मिळवला होता. एका खासगी अभ्यासिकामध्ये समन्वयक म्हणून ते 2013 पासून म्हणजेच पदवी घेतल्यानंतर काम पाहत होते. परंतु हे काम करत असताना त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये खंड न पडू देता दररोज बारा तास अभ्यासाचे वेळापत्रक चालूच ठेवले.
नक्की वाचा:Watermelon; शेतकऱ्यांनो तुमचा माल तुम्हीच विका, कशाला कोणाची धन करता? वाचा सगळं गणित...
अभ्यास करताना त्यांनी मित्रांसोबत चर्चेला फार महत्व दिले. ही चर्चा ते दुपारी 2 ते 5 या वेळेत करायचे. निलेश यांनी राज्य सेवा परीक्षेसह पीएसआय परीक्षेची तयारी देखील केली तसेच तीन वेळा मुख्य परीक्षा देऊनही यश मिळाले नव्हते. परंतु म्हणतात ना प्रयत्न करीत राहिले व ते प्रामाणिकपणे केले तर यश हे मिळतेच. याच एका विचारधारेच्या अनुषंगाने प्रयत्नांती 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत मोठ्या जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्टा केली व यश संपादन केले.
Share your comments