मणिपूर मधील एक शेतकरी चे जैवविविधतेचे संवर्धन करण्यात पारंगत आहेतअसे पोतशंगबम देवकांत यांनी तांदुळाच्या शंभर परंपरागत प्रजातींना सेंद्रिय पद्धतीने पुनरुज्जीवित करून आपला छंद आणि झोकून देण्याच्या वृत्तीतून तब्बल 165 तांदळांच्या प्रजातींचा शोध लावला आहे.
वय वर्षे 65 असलेल्या देवकाते यांनी हे काम छंद म्हणून सुरू केले व आपल्या स्वतःच्या शेतात त्यांनी 25 प्रजातींचा शोध लावला व त्यासोबतच देशी 100 प्रजातींचे संरक्षण देखील केले आहे. त्यांना असलेल्य छंदाच्या माध्यमातून त्यांनी मणिपूरच्या संपूर्ण डोंगरी भागात तांदळाच्या वेगवेगळ्या प्रजातीच्या संशोधनाची मालिका सुरू केली आहे.
या प्रजातीमध्ये बहुतांशी या औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. देवकांत यांनी शोधलेल्या चखावो पोरेटन या काळ्यारंगाच्या तांदळामध्ये व्हायरल ताप, चिकन गुनिया, डेंगू तसेच कॅन्सर सुद्धा बरा करण्याचे ताकत आहे. तांदळाच्या नवीन नवीन प्रजातींचे बीज मिळविण्यासाठी त्यांनी मणिपूरमधील बराचसा डोंगरी भाग पिंजून काढला त्याद्वारे त्यांना बरेचसे प्रजातींचे बीज मिळाले पण अद्यापही अजून काही प्रजातींचे बीज मिळू शकले नाही.
त्यांनी कमी पाण्यात चांगला येणारा पांढऱ्या रंगाचा तांदूळ तर शोधलाच परंतु काळ्यारंगाच्या तांदळाच्या अनेक प्रजातींचा शोध देखील लावला. या काळ्या रंगाच्या तांदळाच्या प्रजाती मध्ये चखाओपोरेटन ही प्रजाती सर्वोत्तम आहे. तसेच ती विविध प्रकारच्या आजारांवर उपयुक्त असून कोणत्याही प्रकारच्या कॅन्सर वर हा तांदूळ गुणकारी आहे.
Share your comments