जर आपण सध्या पिकाची परिस्थिती पाहिली तर ठराविक कालावधी मध्ये काही पिकांना जास्त भाव असतो. परंतु बऱ्याचदा संबंधित पिकाचा कालावधी असून देखील अपेक्षित असा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागतो. असेच काहीशी परिस्थिती लिंबू च्या बाबतीत गेल्या वर्षी होती. ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा लिंबूला मोठ्या प्रमाणात भाव मिळाला नव्हता. परंतु या वर्षात लिंबू ला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असेच एका शेतकऱ्यानेत्याच्या अडीच एकरात लिंबू ची बाग लावली आहे. या अडीच एकर मधून दहा लाखापेक्षा जास्त उत्पादन या शेतकऱ्याला अपेक्षित आहे. या शेतकऱ्याच्या यशाविषयी या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:अशी हि जिगर! एमबीएचे शिक्षण घेऊन मारली शेतीत उडी आणि फुलवली अश्वगंधा ची शेती
अडीच एकर लिंबू च्या माध्यमातून दहा लाखांपेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित
हिंगोली जिल्ह्यातील कांडली या गावचे शेतकरी श्रीकांत पतंगे यांनी त्यांच्या अडीच एकर शेतामध्ये लिंबाच्या बागेची लागवड केली असून आता लिंबूझाडांवर लगडली आहेत.या माध्यमातून त्यांना लिंबोणीच्या बागेतून त्यांना दहा लाखांपेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित आहे.
पतंगे यांच्या मनातनेहमी वडिलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये काहीतरी नावीन्यपूर्ण करायचं असं मनात होतंव त्यांनी ते सत्यात उतरवायची ठरवले. परंतु त्यांच्या शेताचे प्रत एवढी चांगली नसल्याने त्यांच्यापुढे मोठी समस्या होती. यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या सल्ला घेतला व त्यांना माहिती मिळाली की काटेरी झाडांची जर लागवड केली तर अशा जमिनीत चांगले उत्पादन मिळेल. मग त्यांनी पाच वर्षांपूर्वी या शेतामध्ये लिंबोणीच्या झाडाची लागवड केली. अडीच एकर मध्ये जवळपास सहाशे झाडांची लागवड त्यांनी केली. आतापर्यंत या बागेचा देखभालीचा आणि व्यवस्थापनाचा सगळा खर्च हा तीन लाख रुपयांच्या आसपास आहे.या बागेला योग्य पाणीव्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी तीन वर्षात ही बाग उत्पादनक्षम केले आहे.
गेल्या मागच्या वर्षापासून ते या बागेतून उत्पादन घेत असून मागच्या वर्षी लिंबूला चांगला भाव मिळाला नव्हता.
म्हणून त्यांना किरकोळ दराने लिंबूची विक्री करावी लागली होती. परंतु यावर्षी भाव चांगला असल्यानेचांगले उत्पादन अपेक्षित आहे.या वर्षी जर आपण लिंबूच्या बाजारभावाचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी 150 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव आहे. त्यांना त्यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील लिंबू बागेच्या माध्यमातून90 क्विंटल उत्पादन आणि या माध्यमातून या बागेतून साधारणता 13 लाख रुपये इतका मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे.
Share your comments