शेती असो या नोकरी जर आपला निश्चय पक्का असेलव जिद्द असेल तर कुठलेच काम अशक्य नाही. वर्तमान परिस्थितीत असे अनेक यशस्वी शेतकरी आहेत ते आधुनिक पद्धतीने शेती करून एक आदर्श निर्माण करीत आहेत. तसेच शेती एक नफ्याचा व्यवसाय आहे हे सिद्ध करून दाखवीत आहेत.
अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी पठाणकोट जिल्ह्यातील जंगला गावचे राहणारे रमण सलारिया हे एक आहेत. सलारिया हे अनेक वर्षांपासून ड्रॅगन फ्रुट ची शेती करून चांगला नफा मिळवीत आहेत. या लेखात आपण त्यांच्या यशस्वीतेचे कहानी पाहणार आहोत.
इंजीनियरिंग ची नोकरी सोडली परत आले आपल्या गावी
रमण सलारिया पठाणकोट च्या जंगलाया गावचे रहिवासी आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आपली नोकरी सोडून गाव गाठले.गावात परत आल्यानंतर तेशेतीला लागणारा खर्च आणि श्रम कमी कसे करता येईल याबद्दल काम करीत आहेत.तसेच ड्रॅगन फ्रुट शेती करून चांगला नफा कसा कमवता येईल यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करीत आहेत.
सलारिया यांच्या मनात ड्रॅगन फ्रुट ची शेती करण्याचा विचार कसा आला.
रमण सलारीया हे नोएडा येथील एका कंपनीत इंजिनीअर या पदावर कार्यरत होते.नोकरी करीत असताना त्यांच्या मनात नोकरी सोडून शेती करण्याचा विचार आला.त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून आपल्या गावी परत आले वत्यानंतर ड्रॅगन फ्रुट ची शेती करण्याची सुरुवात केली.ड्रॅगन फ्रुट ची शेती ची सुरुवात करताना त्यांनीसुरुवातीला सहा लाख रुपयेभांडवल गुंतवून सुरुवात केली. आता सध्या ते एका एकर जमिनीत ड्रॅगन फ्रुट ची शेती करून प्रति वर्ष आठ ते दहा लाख रुपयांची कमाई करीत आहेत.
ड्रॅगन फ्रुट पासून होते चांगली कमाई
ड्रॅगन फ्रुट पासून शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात.जर शेतकऱ्यांनीत्यांनी पिकवलेल्या ड्रॅगन फुटला बाजारात ठोक भावात विकले तर ते 250 ते 300 रुपये प्रती किलो या भावात विकले जाते.एका एकरात ड्रॅगन फ्रुटचीशेती करण्यासाठी पाच ते सात लाख रुपये खर्च येतो.त्यापासून प्रतिएकर 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. सर्व खर्च वजा करता निव्वळ नफा हा प्रति एकर सात ते आठ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो.
रमन सलारिया यांचा शेतकऱ्यांसाठी संदेश
रमण सलारिया यांचे सांगणे आहे की,शेतकरी बंधूंनी अशा पिकांची लागवड करावी की ज्यामध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. ड्रॅगन फ्रुट च्या शेती मधूनही अधिक नफा कमावता येऊ शकतो.
Share your comments