मित्रांनो भारतात अनेक युवक आपल्या परिश्रमाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर आपले नाव गाजवत असतात आणि अनेक तरुणांसाठी आदर्श ठरतात अशीच एक घटना आहे ग्रेटर नोएडाच्या एका तरुणांची ज्याने आपल्या डेअरी फार्मच्या व्यवसायातून लाखों रुपयांची कमाई केली आहे. त्या युवकांचे नाव आहे दुष्यन्त भाटी. दुष्यन्त भाटी ग्रेटर नोएडा च्या अमरपूर गावातील रहिवासी आहेत.
दुष्यन्त आपल्याच गावात HF गाईंचा डेअरी फार्म चालवीतात, त्यांच्या फार्मचे नाव धनश्री डेअरी फार्म असे आहे. दुष्यन्त यांनी MBA केले आहे त्यांनी लंडन येथून आपले MBA कंप्लेट केले आहे. दुष्यन्त आपल्या फार्म मध्ये विदेशी टेक्निकणे गाई पालन करतात, त्यापासून मिळणारे दुधाचे ते काचेच्या बाटलीत पॅकेजिंग करतात आणि ग्राहक पर्यंत पोहचवितात. दुष्यन्त साफ सफाईची विशेष काळजी घेतात आणि चांगल्या क्वालिटीचे दुध लोकांपर्यंत पोहचवितात.
दुष्यन्त सांगतात की, MBA केल्यानंतर जेव्हा ते मायदेशी परतले तेव्हा त्यांनी असं काही करण्याचे ठरवले की त्यापासून येथील आपल्या लोकांचा फायदा होईल. त्यासाठी त्यांनी अनेक देशातील वाऱ्या केल्या. दुष्यन्त यांनी शेतीसाठी विख्यात असलेल्या इजराईल, होलंड सारख्या देशांचा दौरा केला. तिथे जाऊन दुष्यन्त यांनी डेअरी फार्म वर रिसर्च केला.
ऑटोमॅटिक आहे पूर्ण डेअरी फार्म
दुष्यन्त यांचा धनश्री डेअरी फार्म पूर्णतः ऑटोमॅटिक आहे. आपल्या देशात शेतमजूरची, लेबरची कमतरता दुष्यन्त यांना ठाऊक होती त्यामुळे त्यांनी आपल्या डेअरी फार्मची सुरवात करताना ह्या गोष्टीची काळजी घेतली आणि आपला फार्म हा पूर्णतः ऑटोमॅटिक केला.
त्यांच्या फार्म मधील गाईना चारा टाकण्यापासून ते दुध काढण्यापर्यंत सर्व काम हे मशीनरी द्वारे ऑटोमॅटिक पद्धतीने केले जाते. एवढेच नाही तर पशुचे स्वास्थ्य संबंधीत रिपोर्ट देखील डिजिटल फॉरमॅट मध्ये असतात. हे सर्व गाईच्या पायाला बसवलेल्या एका चिपद्वारे केले जाते. हि चिप एका सॉफ्टवेअर वर चालते, ज्यामुळे वेळेवर समजते की, गाईला स्वास्थ्यविषयक काय समस्या आहे, तसेच कोणत्या वेळी कोणता आहार हा गाईला दिला पाहिजे. हि प्रोसेस 24 घंटे चालूच राहते.
दुष्यंत सांगतात की, त्यांच्या फार्मवर मिळणारे दुध हे स्वच्छ आणि भेसळमुक्त असते. ते गायीच्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ करत नाही, तसेच ते आपल्या ग्राहकांना फार्मला भेट देण्यासाठी आमंत्रित करतात जेणेकरून ग्राहक फार्म बघू शकेल आणि क्वालिटी आपल्या डोळ्याने बघेल. जे व्यक्ती त्यांच्याकडून दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ घेतात ते त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या प्रॉडक्ट्स ची माहिती जाणुन घेऊ शकतात शिवाय त्यांचे प्रॉडक्ट्स हे ग्राहकांपर्यंत कसे पोहचतात हे देखील ते पाहू शकतात. या त्यांच्या पारदर्शक व्यवहारामुळे त्यांनी ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे.
Share your comments