1. यशोगाथा

Success Story : वर्षभर खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडीची लागवड; पिकांतून भरघोस उत्पन्न

बागायती शेतीमध्ये खरबूज कलिंगड हे मुख्य पिक असुन सध्या साडेचार एकर क्षेत्रात खरबूज केली आहे. सव्वा एकर क्षेत्रात कलकत्ता झेंडूची लागवड केली आहे. लागवडीपुर्वी हिरवळीचे खत ताग याची लागवड करून सेंद्रिय खताची पुर्तता केली जाते.

Success Story Update

Success Story Update

पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता.दौंड) येथिल केशव बबनराव होले यांची ८ एकर शेती आहे. संपूर्ण शेती बागायती असून खरबूज, कलिंगड आणि झेंडू मुख्य पिके आहेत. खरबूज कलिंगड पिकातून वर्षाला एकरकमी ऊत्पादन मिळते. मात्र त्यासोबतच झेंडू पिकाचे नियोजन केले जाते. उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी केशव होले प्रयत्न करतात.

*निश्चित वार्षिक उत्पन्नांसाठी
बागायती शेतीमध्ये खरबूज कलिंगड हे मुख्य पिक असुन सध्या साडेचार एकर क्षेत्रात खरबूज केली आहे. सव्वा एकर क्षेत्रात कलकत्ता झेंडूची लागवड केली आहे. लागवडीपुर्वी हिरवळीचे खत ताग याची लागवड करून सेंद्रिय खताची पुर्तता केली जाते. शेणखत बाहेरुन विकत घेऊन घालण्यापेक्षा हे स्वस्त पडते काटेकोर जलसिंचनासाठी ठिबक सिंचन केले आहे. खरबुजाचे प्रति एकरी २० टनांपर्यंत तर कलिंगडाच्या प्रति एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत ऊत्पादन मिळते. खरबुजाला १० रुपये ते ३५ इतका दर मिळतो. कलिंगडास ६ रुपये ते २० इतका दर मिळतो.

*खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडी लागवडीची तयारी
जानेवारीच्या दरम्यान खरबूज लागवड तर मार्च-एप्रिल मध्ये कलिंगड लागवड, जुन-जुलै महिन्यात झेंडू लागवड केली जाते. खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडी पिकांच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रति एकरी उत्पादन खर्च कमी करून जास्त ऊत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जातो.

*खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडी पिकाच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी
१) सहा फुट अंतरावर बेड, सिंगल रोप लागवड
२)बी लागवडीवर जास्त भर
३) एकरी ६००० रोपांची लागवड, खरबूज एकरी २५-३० टन, कलिंगड एकरी ३५-४० टन, झेंडू एकरी १३-१५ टन, काकडी एकरी ४० टन ऊत्पादन मिळेल असे नियोजन
४) बी लागवडीनंतर १५ दिवसांनी विद्राव्य खतांचे नियोजन
५) माती परिक्षण दरवर्षी केले जाते
६) खरबुज, कलिंगड, झेंडू, काकडी या पिकांच्या ऊत्पादकतेसाठी माती, पाणी, बियाणे व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते
७) मशागतीच्या वेळी ऊभी आडवी नांगरट केली जाते, कारखान्याकडील कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर एकरी ५-१० टनापर्यंत वापर
८) ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, पॉलिस्टर पेपर यांचा सातत्याने वापर

*केशव होले यांची शेती
साधारणपणे जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने खरबूज लागवड केली जाते. या पिकासाठी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या क्रॉप कव्हर तंत्रासाठी एकरी १८ ते २० हजार रुपये अधिक खर्च होतो. मात्र तन नियंत्रण, पीक संरक्षण खर्चात बचत, पाणी बचत होते. या सोबतच ऊत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होते. फळांचा दर्जा चांगला मिळतो परिणामी बाजारपेठ दर चांगला मिळतो. सेकंड बेडवर कलिंगड लागवड केली जाते. कलिंगड निघाल्यानंतर त्याच बेडवर झेंडू पिकाची लागवड केली जाते. एकावेळी टाकलेल्या मल्चिंग पेपरवर तीन पिके निघू शकतात म्हणजेच खर्च निम्याहून कमी होतो.

*शेती बदलाचे नियोजन
१) वाढत्या तापमानात शेती शाश्वत करण्यासाठी केशव होले यांनी संरक्षित शेतीचा प्रयोग केला आहे. २)सव्वा एकर क्षेत्रात काकडी पिकाकरिता बांबू आणि पॉलिस्टर पेपरच्या सहाय्याने कमी खर्चात शेडनेटची उभारणी त्यांनी केली आहे. पॉलिस्टर पेपरचे फायदे हवामान नियंत्रणात राहते फुलकळी गळत नाही कीड आणि रोग नियंत्रणात राहतात. पाण्याची व खताची बचत होते, कृषी निविष्ठांवरील खर्च कमी होतो संरक्षित शेतीतील व्यवस्थापन बांबू आणि पॉलिस्टर पेपरच्या सहाय्याने तयार केलेल्या शेडनेटमध्ये काकडी पिकाचे उत्पादन घेत चांगले उत्पन्न घेण्याचा केशव होले यांनी प्रयत्न केला आहे ही संरक्षित पद्धतीची शेती असल्याने खुल्या शेतीतील पिकांपेक्षा एकरी उत्पादन जास्त मिळते.
३) मल्चिंग पेपरवर सहा बाय एक फुटावर सरळ ओळ पद्धतीने काकडीची बी लागवड विद्राव्य खतांचा संतुलित वापर जिवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर बुरशीनाशक व कीटकनाशक यांचा आवश्यकतेनुसार वापर शेडनेटमुळे पाण्याचा अतिरिक्त वापर कमी झाला पारंपारिक पद्धतीपेक्षा उत्पादनात वाढ होते पिकाची जोमदार आणि निरोगी वाढ झाली.

*नाविन्यपूर्ण प्रयोगातून आपण काय शिकायचे-
१) संरक्षित पीक पद्धतीचा वापर सव्वा एकर क्षेत्रात पॉलिस्टर पेपर व बांबूच्या साहाय्याने कमी खर्चात शेडनेट उभारणी
२) कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी पिकाचे निरीक्षण
३) शेतीत सातत्याने नवीन प्रयोग करत राहायचे त्याच त्या चक्रात अडकून राहायचे नाही
४) परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हार मानायची नाही
५) पिकातील योग्य त्या तज्ज्ञांचा अनुभवी व्यक्तींचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायचे
६) प्रतिकूल निसर्ग किंवा संकटाला सामोरे जाताना त्याच्याच आयुधांचा वापर करायचा
७) जिद्द अभ्यास आणि आत्मविश्वास आपल्या कामातून दिसून आला पाहिजे
९) शेतीत कुठलाही नवीन प्रयोग करण्यापूर्वी स्वतःची खात्री पटेपर्यंत धीर धरा
१०)प्रयोगशील शेतकरी तज्ञ शास्त्रज्ञ यांची आवश्यकता असल्यास मदत घ्यायची
११) शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे विषयी विचार करायचा
१२) शेती यशस्वी करायचे असेल तर त्या पिकातील तज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहायचे

*आर्थिक शिस्त महत्त्वाची
दरवर्षी वार्षिक ताळेबंद मानला जातो कोणत्या पिकातून किती फायदा किंवा नुकसान झाले याचा अंदाज केशव होले घेतात. त्यानुसार पुढील वर्षाचे पीक नियोजन व अंदाजपत्रक तयार केले जाते. आर्थिक शिस्तीवर केशव होले यांचा विशेष भर असतो. पिकांमधून येणाऱ्या नफ्यातील काही भाग नेहमी शेती सुधारणा यंत्रणांची देखभाल दुरुस्ती व बहुतांश उत्पादनक्षम बाबींमध्ये गुंतवला जाईल यावर भर असतो

*दर्जा व सातत्य महत्त्वाचे
केवळ पीक लागवड करून विक्री झाली म्हणजे सगळे झाले असे होत नाही. बाजारपेठेचा अभ्यास दर आवक यांचा अभ्यास करणे गरजेचे असते. बाजारपेठ म्हटलं की तेजी मंदी आलीच मला बरोबर आपले नावही जोडलेले असते ते व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी तुमच्या मालाचा दर्जा उत्तम हवा सातत्य असल्याने मंदीतही पैसे होतात हा अनुभव आला आहे .

*नोंदवहीत नोंदी
मागील तीन वर्षापासून केशव होले यांनी पीक व्यवस्थापनाच्या सर्व नोंदी नोंदवहीत तारीख वार ठेवल्या आहेत. यामध्ये लागवड ते विक्री संबंधितचा तपशील मिळालेला दर खर्च याची सविस्तर माहिती नोंदविलेली आहे. पीक व्यवस्थापन करताना फवारणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत तपशीलवार नोंदी असून त्याचा काय परिणाम झाला याचीही नोंद घेतलेली आहे व निरीक्षण नोंदविलेले आहे.

*खरबूज, कलिंगड, झेंडू व काकडी या पिकांच्या व्यवस्थापनाबद्दल सविस्तर माहिती
या पिकांच्या उत्पादनासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन यामध्ये सेंद्रिय जैविक व रासायनिक खतांचा संतुलित अवलंब पिकांच्या उत्पादकतेसाठी माती पाणी बियाणे व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व. बी लागवडीवर जास्त भर आवश्यकता भासल्यास बियाणे देऊन रोपवाटिकेतून निरोगी रोपे तयार करून घेतली जातात. १३ ते १५ दिवसांच्या रोपांची पुर्नलागवड केली जाते. सहा फूट अंतरावर बेड डबल लॅटरलचा वापर सिंगल रोप लागवडीचा प्रयोग सहा बाय एक फुटावर लागवड. मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा आवश्यकतेनुसार वापर ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलस सबस्टीलस आणि एनपीके जिवाणू खते यांचा संतुलित वापर मशागतीच्या वेळी सबसॉयलरचा वापर उभी व आडवी नांगरट केली जाते. कारखान्याकडील कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर. ठिबक सिंचन मल्चिंग पेपर, नॉन ओव्हन क्रॉप कव्हर, पॉलिस्टर पेपर यांचा वापर, हिरवळीच्या खताचा वापर, दर वर्षी शेतीतील वाढता खर्च कमी करतानाच जमिनीत सेंद्रिय खतांची उपलब्धता करण्यासाठी हिरवळीच्या खतांचा यामध्ये ताग याचा वापर केला जातो. पिकासाठी वेस्ट डिकंपोजरचा वापर ते करतात.

*शेतीत विविध मान्यवरांच्या भेटी
जैन इरिगेशनचे सिनियर मॅनेजर श्री. व्ही. बी पाटील, श्री कुंडलिक कारखिले-प्रकल्प उपसंचालक(आत्मा) पुणे जिल्हा, तैवान येथील नॉन यु सिडस्चे ब्रिडर लिंडा मॅडम, रायना सर, गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा, चामोर्शी, धानोरा तालुक्यातील १५० शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र प्रशिक्षण यांनी भेटी दिल्या आहेत. ऊत्कर्षा वाकोडे-अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोर, ज्ञानेश्वर संजय अहिरे- मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे यांनी संशोधन प्रकल्प अहवालाकरिता सदिच्छा भेट दिली. प्रियंका खर्डे-पीएचडी स्कॉलर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी संशोधन प्रकल्प अहवालाकरिता भेट दिली आहे. सिंगापूर येथील कृषी तंत्रज्ञ जे.सि.शिआसर यांनी भेट दिली आहे.

*आजवर मिळालेले पुरस्कार
१)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १० व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन - महात्मा फुले शिक्षण कार्यगौरव पुरस्कार २)कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य व उद्यो भारती आयोजित युवाप्रताप राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार- जयंत प्रगतशील शेतकरी पुरस्कार
३) दौंड तालुका कृषी ऊत्पादक व प्रकिया सहकारी संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) आयोजित दौंड कृषी महोत्सव-शेतकरी मित्र पुरस्कार
४) साप्ताहिक कृषीसेवक-सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील कृषिसेवक पुरस्कार
५) कृषी विभाग व सहकार विभाग महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) पुणे कृषी महोत्सव पुणे २०१८ जिल्हा ‘आत्मा’ पुणे - उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार २०१७-१८
६) कृषी विज्ञान केंद्र बारामती मधुसंदेश प्रकल्पांर्तगत- उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार २०१८
७) आर .के फाऊंडेशनच्या वतीने कृषिभूषण स्वर्गीय रावसाहेब कडलग पुरस्कार- कृषीक्रांती २०१८ राज्यस्तरीय पुरस्कार
८) शब्दधन सोशल फाऊंडेशन बारामती- राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार
९) किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग प्रस्तुत छत्रपती शिवराय नवरंग आर्ट लिटरेचर कॉन्फरन्स कोल्हापूर २०१९- राष्ट्रीय राजमुद्रा शिवसन्मान अवॉर्ड २०१९
१०) अॅग्रोकेअर कृषीमंच नाशिक व अॅग्रोटच अॅग्रोकल्चरल सर्विसेस एल.एल.पी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार २०१८
११)GRD कृषीशक्ती- समृद्ध शेतकरी सन्मान पुरस्कार

*आव्हानातून शेती यशस्वी
अलीकडील काळात हवामान बदलामुळे सर्वच भाजीपाला उत्पादकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या अडचणी येत असतात अनेकदा बियाण्यांची उगवण एकसारखी होत नाही. दुबार टोकनही करावी लागते यामुळे पिकाचा कालावधी कमी जास्त होतो. काही वेळा किडनाशकांची फवारणी करूनही कीड व रोग आटोक्यात येत नाही अशा कारणामुळे खर्चात मोठी वाढ होते. नैसर्गिक आपत्ती आल्यास व्यवस्थापन खर्च जवळपास दुप्पट होतो. संघर्ष करीत प्रतिकूल परिस्थितीत आपली पिके टिकवून धरण्याचे प्रयत्न व सातत्य केशव होले यांच्या दिसून येते.

*शेतमाल विक्री
शेतमाल विक्रीसाठी केशव होले डेलीशियस फार्म फ्रेश हा ब्रँड तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. रेसिड्यु फ्री पद्धतीने उत्पादन केलेल्या कलिंगड खरबूज काकडी यांना ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. मुंबई-पुणे बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून केशव होले डेलीशियस फ्रॉर्म फ्रेश फ्रुट्स या ब्रँड व लोगो द्वारे प्रतवारी करून क्रेटद्वारे खरबूज व कलिंगडाचे मूल्य संवर्धन करून विक्री केली जाते. बाजारपेठे त्यास चांगला उठाव दर मिळू लागला आहे
*शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही
शेतीतील ज्ञानासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र याबरोबरच प्रशिक्षणे, चर्चासत्र व प्रदर्शन यांना भेटी देतात. कृषी विभागाने आयोजित केलेल्या शेतीविषयक प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घेतात यामुळे आपली शेतीकडे पाहण्याची दृष्टी बदलते असा अनुभव आहे.

*माती हाच श्वास
मृदा आरोग्य जपण्याला प्राधान्य जमिनीतून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पीक फेरपालट केली जाते. जमिनीतील बुरशी नियंत्रित करण्यासाठी झेंडू लागवड जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढविण्यासाठी अधिकाधिक जीवाणू खतांचा वापर पीक अवशेषांचा खत म्हणून वापर, दरवर्षी पीक अवशेषांचा जमिनीमध्ये वापर केल्याने त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती होते.

*खरबूज कलिंगड ठरले टर्निंग पॉईंट
खरबूज आणि कलिंगड पिकात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग केले. सन २००६ पासून ते खरबूज आणि कलिंगड पिकांची लागवड करतात. तेव्हापासून ते खरबूज आणि कलिंगड पिकात कुशल होण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध प्रयोग केले. हाच टर्निंग पॉईंट ठरला असे म्हणता येईल दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासह विविध वाणांचे प्रयोग त्यांनी केले आणि उत्पादन वाढ मिळवली .

*पीक पद्धती व व्यवस्थापन
बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून हंगामनिहाय पिकांची निवड केली जाते. दरवर्षी मशागत करून कंपोस्ट खताचा एकरी तीन ट्रेलर वापर होतो. कलिंगड, खरबूज, झेंडू व काकडी या पिकासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. एकरी ३० कामगंध सापळे लावले जातात. पीक वाडीच्या टप्प्यात सेंद्रिय जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जातो. माती परीक्षण शिफारसीनुसार रासायनिक सेंद्रिय व जैविक खतांचा वापर केला जातो. माशांना आकर्षित करण्यासाठी मोहरीची आणि झेंडूची लागवड केली जाते. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी दरवर्षी ताक बाईंच्या या पिकांबरोबरच पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जातात.

*मार्गदर्शकाच्या भूमिकेत
केशव होले सतत तज्ज्ञांच्या संपर्कात असतात. केशव होले यांचा खरबूज, कलिंगड शेतीतील १९ वर्षाचा अनुभव पाहता त्यांच्या दीर्घ व यशस्वी अनुभवाचा उपयोग गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना फोन द्वारे किंवा प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्यांची सोडवणूक व्हावी. यासाठी देखील केशव होले सतत प्रयत्नशील असतात.

*लाखोचे नुकसान तरीही उभारी
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात सुमारे सात एकरात लागवडीचे नियोजन झाले होते. लॉकडाऊन सुरू झाला आणि बाजारपेठ ठप्प झाली. सर्व माल शेतातच सोडून देण्याची वेळ आली. या वेळी तब्बल १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तरीही खचून न जाता त्यांनी पुन्हा हिंमत एकवटली आणि शेतीत सकारात्मक व ऊत्साहरुपी चैतन्य भरले.

*शेतीचा एकरी ताळेबंद
१) खरबूज - २० टन उत्पादन, खर्च- १ लाख रुपये, उत्पादन खर्च वजा जाता- एकरी- १ ते १.७५ लाख रुपये
२) कलिंगड- ३० ते ३५ टन उत्पादन, खर्च- ६० ते ७० हजार रुपये, उत्पादन खर्च वजा जाता एकरी- १ लाख रुपये.
३) झेंडू- १० टन उत्पादन, खर्च- ८० हजार रुपये, उत्पादन खर्च वजा जाता एकरी- १ लाख रुपये
४) काकडी - ४० टन उत्पादन, खर्च - १ लाख ५० हजार रुपये, उत्पन्न- २ लाख रुपये
५) मजुरी, खते, औषधे, डिझेल- ३ लाख रुपये खर्च होतात.

(केशव बबनराव होले,  मु.पो.पाटस, ता.दौंड, जि.पुणे, संपर्क क्रमांक - ९९७५५४१२७२)
ई-मेल - keshavhole@gmail.com

English Summary: Cultivation of Melon Kalingad Marigold and Cucumber throughout the year Generous income from crops Success Story Published on: 03 November 2023, 01:37 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters