सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना या योजनेत तुम्ही दरवर्षी २५० रुपये भरून लाखो मिळवू शकता.
तुम्ही आता या योजनेत पैसे गुंतवायला सुरुवात केल्यास, तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिच्या हातात लाखो रुपये असतील. पण आता या प्लॅनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, चला जाणून घेऊयात काय बदल करण्यात आले आहेत.
पूर्वीच्या नियमांनुसार १० वर्षांची मुलगी हे खाते ऑपरेट करू शकत होती. पण आता मुली १८ वर्षापर्यंत खाते चालवू शकत नाहीत. तोपर्यंत फक्त पालकच खाते ऑपरेट करू शकतात. यापूर्वी, या योजनेत पहिल्या दोन मुलींना आयकर सवलत देण्यात आली होती. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळाला नाही.
मात्र आता जुळ्या मुलींच्या बाबतीत त्यांनाही खाते उघडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योजनेत २५० रु. ते १.५ लाख रु. भरण्याची तरतूद आहे. किमान रक्कम न भरल्यास खाते बंद केले जाते. पण आता तसे होणार नाही. खाते आता वापरले नाही तर, ते परिपक्व होईपर्यंत ठेवीवर व्याज जमा होत राहील.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यावर व्याज जमा केले जाईल. जर मुलीचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला असेल किंवा तिचा पत्ता बदलला असेल तर ते खाते बंद केले जात होते. पण आता मुलगी गंभीर आजारी पडली किंवा आई-वडिलांचा मृत्यू झाला तरी खाते बंद केले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात लवकरच भरली जाणार 7 हजार पदे; पोलीस भरतीची तारीख जाहीर
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, करणार या उपाययोजना
Share your comments