काजू म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोकण किनारपट्टी चा भाग. आपल्याला माहिती आहे की काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इत्यादी कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. तसे पाहायला गेले तर तेथील हवामान या पिकासाठी पोषक आहे.
परंतु हेच काजूचे उत्पादन मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात कोणी घेत असेल तरी याबाबत विश्वास बसणार नाही.परंतु हे खरे आहे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील खडका उमरगा येथील शेतकरी विष्णू कदम यांनी हे अशक्यप्राय काम शक्य करून दाखवले आहे.
जाणून घेऊ विष्णू कदम यांचा काजू बागेविषयी चा प्रवास?
मराठवाड्या सारख्या पारंपारिक पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देत विष्णू कदम यांनी काजू लागवडीचे मनात ठाणनथेट कोकणातून काजूची रोपे आणली व त्यांची लागवड त्यांच्या मालकीच्या अर्धा एकरात केली.
अथक परिश्रम आणि योग्य नियोजन व काजू बागेसाठी लागणारे तंत्रज्ञान याचा वापर करून त्यांनी अक्षरशः अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. अवघ्या अर्धा एकरात लावलेल्या या काजू बागेच्या माध्यमातून त्यांना दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न पदरी पडत आहे. तसे पाहता काजू या पिकासाठी दमट हवामान फार आवश्यक असते. परंतु विष्णू कदम यांनी मराठवाड्यातील डोंगराळ भागात काजू पीक यशस्वी करून दाखवले. गेल्या चार वर्षापासून या बागेच्या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळत असून मेलेल्या काजूवर कुठलीही प्रक्रिया न करता ते विकले जात आहे.
त्यांच्या अर्धा एकरात लावलेल्या 40 झाडांपासून त्यांना काजूचे दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
काजू हे पीक अतिशय कमी पाण्यात येणारे पीक असून आवश्यक तेव्हाच पाणी दिल्यानंतर ते बहरते तसेच वर्षातून दोनदा फवारणी केली तरी चालते काजू बागेसाठी सुपीक जमिनीची आवश्यकता नसूनअगदी डोंगराळ भागात काजूचे उत्पादन घेता येते. असे विष्णू कदम यांनी सांगितले.(साभार- टीव्ही नाईन मराठी )
Share your comments