पंढरपूर (Pandharpur Agriculture News) तालुक्यातील ओझेवाडीच्या माळावर एका तरुणाने प्रक्रिया उद्योग उभारला आणि आता तो लाखो रुपये मिळवत आहे. अभय नागणे हा शेतकरी तरुण सध्या MBA चे शिक्षण घेत असून याचवेळी त्याने धाडस करत काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला.
आता तो रोज एक टन काजूवर प्रक्रिया करुन उच्च प्रतीचे काजू तयार करत आहे. त्याच्या मालाला स्थानिक बाजारातच एवढी मागणी आहे की त्याचा तयार झालेला माल बाजारात चढ्या दराने विकला जात आहे.
आपल्याच शेतात छोटेखानी काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला. सुरुवातीला एका खोलीत हाताने सुरु केलेला हा उद्योग आता दोन वर्षात पूर्ण अत्याधुनिक केला असून रोज एक टन एवढ्या काजूवर तो प्रक्रिया करतो. काजूचे अर्थशास्त्र मांडताना त्याने पहिल्यांदा कच्चा मालाचा अभ्यास केला.
या जातीच्या कोंबडीचे संगोपन आहे फायदेशीर, एक अंडे 100 विकलं जातंय, जाणून घ्या..
त्याने आफ्रिकन देशातील कच्चा काजू आणण्यावर लक्ष केंद्रित केले आणि कोकणापेक्षा कमी भावात चांगल्या दर्जाचा कच्चा माल अभयला आफ्रिकन देशातून मिळू लागला. महिन्याला 30 टन एवढा कच्चा माल अभय मेंगलोर येथील बंदरातून उचलून ओझेवाडी या आपल्या गावातील शेतात आणतो.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा, 13 ते 15 मार्चला पावसाची शक्यता
साधारण 100 ते 120 रुपयांच्या दरम्यान त्याला हा कच्चा माल मिळतो. यानंतर अभयने शेतातच उभारलेल्या शेडमध्ये त्याच्यावर प्रक्रिया केल्या जातात. राज्यात केवळ कोकण , कोल्हापूर याच भागात काजू प्रक्रिया उद्योग आहेत. आपली बाजारपेठ एवढी मोठी आहे की लाखो टन काजू आपणास आयात करावे लागतात. हेच जर आपण हा काजू आपल्याच राज्यात आणि देशात बनवल्यास कोट्यवधींची उलाढाल शेतकरी तरुण करेल असे अभयला वाटते.
भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? संजय राऊतांच्या आरोपाने उडाली खळबळ
लिटरला 1500 हजार रुपये! ही शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल..
भटक्या गायींपासून सुटका होणार, गोशाळा करू शकतील नवीन व्यवसाय, नीती आयोगाची नवीन योजना
Share your comments