भारतात अनेक सुशिक्षित तरुण व्यवसायाकडे वळतांना दिसत आहेत आणि व्यवसायातून चांगली मोठी कमाई करत आहेत. अनेक तरुण आपल्या चांगल्या नौकरीचा त्याग करून व्यवसाय करत आहेत ह्यांचे प्रमुख कारण म्हणजे व्यवसायात नौकरीपेक्षा अधिक संधी उपलब्ध आहेत आणि नौकरीपेक्षा व्यवसायात कमाई ही जास्त होऊ शकते. असाच एक अवलिया तरुण आपली चांगली नौकरी सोडून शेतीकडे तसेच पशुपालन कडे वळला आणि आपले यश संपादन केले.
ह्या अवलिया तरुण शेतकऱ्याचे नाव आहे जयगुरू आचार हिंदर. जयगुरू आधी पेशाने इंजिनीअर होते, परंतु आता पशुपालन करतात आणि दुध विक्री करतात तसेच शेणखताची विक्री करतात. जयगुरू ह्यांनी आपली स्वतःची दुध डेअरी सुरु केली आहे आणि त्यांच्या ह्या व्यवसायातून ते चांगली तगडी कमाई करत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया त्यांच्या ह्या यशाविषयी.
आधी इंजिनिअर म्हणुन करायचे काम
जयगुरू आधी इंजिनिअर म्हणुन एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते आणि त्यांना ह्या कंपनीत कसाबसा 22000 रुपये पगार मिळत होता. जयगुरू ह्यांनी बॅचलर ऑफ इंजिनीरिंगची डिग्री प्राप्त केली होती. त्यांनी आपली इंजिनीरिंग विवेकानंद कॉलेज मधून केले जे की दक्षिण कन्नड मधील पुत्तूर येथे स्थित आहे.
असा सुरु केला व्यवसाय
जयगुरू ह्यांना आधीपासून पशुपालनात इंटरेस्ट होता त्यांच्या वडिलांकडे 10 गाई होत्या आणि जयगुरू हे आपल्या वडिलांना ह्या गाई पालनात मदत करत असतं. जेव्हा पण जयगुरू सुट्टीवर घरी येत तेव्हा ते आपल्या वडिलांना मदत करत असतं. मग एक वेळ असा आला जयगुरूला पशुपालनात जास्त रुची वाटायला लागली आणि त्यांनी आपला जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये त्यांनी आपला जॉब सोडला आणि पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. जयगुरू ह्यांनी आपला डेअरी चा बिजनेस वाढवला आणि चांगली प्रगती केली. जयगुरू आता जवळपास 130 पशुचे पालन करतात तसेच त्यांनी 10 एकर जमीन देखील खरेदी केली आहे. शेतात त्यांनी अखरोट लागवड केली आहे यासोबतच ते शेणखतही विकतात.
आता दर महिन्याला जयगुरू 1000 गोण्या शेणाची विक्री करतात. आजूबाजूच्या गावातील लोक ते विकत घेतात. जयगुरू एका महिन्यात 750 लिटर दूध आणि 30 ते 40 किलो तूप विकतात. त्यांच्याकडे 10 जणांचा स्टाफ आहे. त्यांच्याकडे दूध काढण्यासाठी मशीनही आहेत. यामुळे कामगारांचे काम कमी होते शिवाय कमी कामगार लागतात. जयगुरू सांगतो की तो सेंद्रिय उत्पादने विकत आहे आणि याचा त्याला खूप आनंद आहे. जयगुरू आपल्या व्यवसायातून महिन्याला जवळपास 10 लाख रुपये कमवत आहेत. जयगुरू हे अनेक तरुणांसाठी आदर्श आहेत.
Share your comments