गहू हे रब्बी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये गव्हाची पीक रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गहू लागवड क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पंजाब आणि हरियाणा ही राज्य अग्रेसर आहेत.
परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर अगोदर ज्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जायची तेवढ्या क्षेत्रात आता लागवड होत नाही. यामागे बरीचशी कारणे देखील असतील.
आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच की गहू म्हटले म्हणजे आपण नियमित वापरत असलेल्या गव्हाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु यामध्ये गव्हाच्या प्रकारांमध्ये काळा गहू हा एक प्रकार आहे.
त्याचे नाव सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याची लागवड पद्धत किंवा महाराष्ट्रात त्याचे उत्पादन घेतले जाते तसे फार कमी ऐकण्यात आहे किंवा नसेलही. परंतु सध्या जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला वेगवेगळ्या पद्धतीच्या पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
मग ती भाजीपाला पिके असो की फळपिके. आपण फळपिकांचा जरी विचार केला तर अक्षरशः स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट आणि सफरचंदाचे लागवडीचे प्रयोग देखील महाराष्ट्रात केले जात आहे.
असाच एक काळा गहू लागवडीचा प्रयोग महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यांनी यशस्वी उत्पादन देखील घेतले आहे. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
काळ्या गव्हाच्या लागवडीचा प्रयोग
आता आपल्याला माहित आहेच की या गव्हाच्या लागवडीचा विचार केला तर जास्त भरून ते पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात मोठ्या प्रमाणात केले जाते.
परंतु महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात असलेल्या जळगावच्या शेतकऱ्याने काळा गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी करुन उत्पादन देखील घेतले आहे.
या गावचे सुशिक्षित शेतकरी राजेश डफर यांनी अनेक माध्यमातून या गव्हाच्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती घेतली व त्याचे बियाणे मिळवले. त्यांना काळा गव्हाचे बियाणे जवळजवळ 80 रुपये किलो दराने मिळाले व एक एकर क्षेत्रावर त्यांनी 45 किलो बियाण्याची पेरणी केली.
नक्की वाचा:पिक लागवड:अवघ्या 4 महिन्यात कमवू शकता 2 लाख रुपये, 'या' पिकाची लागवड ठरेल टर्निंग पॉइंट
या लागवडीतून त्यांनी जवळजवळ 17 क्विंटल उत्पादन शेतकऱ्याने घेतले आहे. 39 वर्षे वय असलेल्या राजेश डफर यांनी काळा गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
या गव्हाची वैशिष्ट्ये
काळा गहू म्हटले म्हणजे हा सामान्य गव्हापेक्षा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो.
आरोग्यासाठी लाभदायी असल्यामुळे बरेच जण याचा आहारात वापर करू लागले आहेत. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा गहू अत्यंत फायदेशीर आहे, कारण सामान्य गावापेक्षा यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हा गहू हळूहळू बऱ्याच जणांच्या पसंतीस उतरेल.
नक्की वाचा:Farming Idea:एकदा लावा गुलाब आणि कमवा दहा वर्ष,गुलाबा पासून बनतात 'ही'उत्पादने
Share your comments