शेतीमध्ये आपण बघतो की अनेकदा वेगवेगळे चमत्कार बघायला मिळतात. आता असेच काहीसे मध्य प्रदेशमध्ये घडले आहे. मध्यप्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील (Banana Fruit) केळीची लांबी पाहून ( agronomist ) कृषीतज्ञही अवाक् झाले आहेत. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये चक्क 13 इंच लांब असलेल्या (Banana Production) केळीचे उत्पादन घेतले आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.
येथील शेतकरी अरविंद जाट या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साडेसहा एकरावर केळीचे पीक घेतले. जाट यांना देखील 13 इंच लांब केळीचे उत्पादन होईल अशी आशा नव्हती पण हे झाले असून एका केळीचे वजन हे 250 ग्रॅम आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीमध्ये देखील येथूनच केळी मागवली जाते. या कंपनीत दिल्ली येथील कर्मचारी असून त्यांच्यासाठी ही केळी मागविण्यात आली आहे. यामुळे अनेकांना याची भुरळ पडली आहे.
तसेच ही केळी इराण आणि इराकला 10 ते 12 टन पाठविण्यात आली होती. जेवढा उत्पादनावर खर्च होतो त्यापेक्षा तिपटीच्या दरात ही केळी विकली जात आहे. यामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे. दिवसेंदिवस उत्पादनात वाढ ही ठीक आहे पण 13 इंच लांब केळी पाहून त्यांना देखील आश्चर्य वाटले होते. पिकामध्ये सातत्य आणि त्यांना झालेला अभ्यास यामुळे हा पराक्रम घडला आहे.
टोमॅटोने हटवला दुष्काळ! टोमॅटो शंभर रुपये किलो, शेतकरी झाले मालामाल
गेल्या 37 वर्षापासून केळीची शेती करतात. त्यामुळे लागवडीपासून ते काढणीपर्यंत या पिकाला काय लागते याचा त्यांना अचूक अभ्यास झाला आहे. येथील व्यापारी केळी काढणीची मजुरीही शेतकऱ्यांकडूनच घेतात तर परदेशात केळी पाठवताना असे होत नाही. शिवाय दरातही मोठी तफावत असल्याने निर्यात केलेलीच परवडत असल्य़ाचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. यामुळे त्याठिकाणी शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होतो.
महत्वाच्या बातम्या;
म्हैस खरेदीवर सरकार शेतकऱ्यांना देणार ५०% अनुदान, जाणून घ्या
ऊसतोड मजुरांचा सत्कार करून 3 एकर उसाला लावली काडी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नुकसानीचा पहिला हप्ता, शेतकऱ्यांना दिलासा
Share your comments