शहरी तरुण आणि ग्रामीण भागातील तरुण यांचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील तरुण कुठल्याही तुलनेत शहरी तरुणांच्या मागे नाहीत.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खूपच टॅलेंट आहे. परंतु त्यांच्यात असलेल्या या टॅलेंटला योग्य वाव मिळणे तितकेच महत्त्वाचे असते. आता आपण बऱ्याच वेळा वाचतो की, शेती संबंधी अनेक जुगाडू उपकरणे शेतकरी पुत्रांनी तयार केले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी आपण अशाच एका शेतकरी पुत्रा ची यशोगाथा सोशल मीडिया मधून वाचली असेलच. ज्याचे नाव कमलेश घुमरे म्हणजे जुगाडू कमलेश असे आहे. अशाप्रकारचे बरेच कमलेश ग्रामीण भागामध्ये दडलेले आहेत. परंतु त्यांना गरज आहे ती योग्य मार्ग आणि संधी उपलब्ध करून देण्याची. परंतु आता अशाच एका ध्येयवेड्या तरुणाने असे काही काम केले आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक ठिकाणीच गलेलठ्ठ पगाराची नोकरी उपलब्ध होणार आहे.
नक्की वाचा:लाल मुळा ४० दिवसांमध्ये देतो तुम्हाला भरपूर नफा, आता शेतकऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज
या ध्येयवेड्या तरुणाची यशोगाथा
रावसाहेब घुगे या तरुणाची अमेरिकेत स्वतःची कंपनी आहे.
त्यांच्या मुलासाठी आपण काहीतरी वेगळे करावे या त्यांच्या जिद्दी पोटी त्यांनी बाप कंपनीचे संकल्पना पुढे आणली. अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या गावांमध्ये त्यांनी कंपनीचे काम सुरू केले. कंपनीमध्ये ते शेतकऱ्यांच्या मुलांना भरघोस पगाराची नोकरी देत आहेत. आयटी कंपन्यांचे जाळे जर आपण पाहिले तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जास्त आहे. परंतु ग्रामीण भागातील तरुणांना आयटी क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु या तरुणाने बिजनेस ॲप्लीकेशन अँड प्लॅटफॉर्म अर्थात बाप या आयटी कंपनीची उभारणी करून शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
रावसाहेब घुगे यांचे काम
37वर्षाचे रावसाहेब रामनाथ घुगे हे खडकाळ अशा माळरानावर ही कंपनी उभी करत असून ते सध्या अमेरिकेत आयटी कंपनी चालवतात.
शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याच्या हेतूने त्यांनी या कंपनीचे बांधकाम सुरू केले असून आता ते काम प्रगतीपथावर आहे. येत्या जूनमध्ये हे काम प्रत्यक्षात सुरू होणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना जागतिक स्तरावर नोकरी करण्याची संधी मिळेल. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीत बारावी पास होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना विशेष प्राधान्य दिले जाणार असून या ठिकाणीच तीन वर्षाचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची 45 मुले-मुली घुगे यांच्याशी जोडली गेली असून सध्या ते व काम होम ऑनलाईन काम करीत आहेत.
नक्की वाचा:हापूस च्या नावावर दुसरे आंबे विकल्यास तुमचा परवाना होणार रद्द
रावसाहेब घुगे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्यांची घरची परिस्थिती अगदीच जेमतेम होती. परंतु कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी पारेगाव खुर्द येथे प्राथमिक, नान्नज येथेमाध्यमिक आणि संगमनेर ते बारावी सायन्स आणि मुंबईत मस्टर ऑफ कम्प्युटर सायन्स ची पदवी पूर्ण केली.
तीन ते चार कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर ते अमेरिकेत गेले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये पार्टनरशिप तत्त्वावर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. तेथील कंपनी सांभाळून गावाकडे कंपनी सुरू करताना त्यांना अनेक अडचणी आल्या परंतु एका छोट्याशा खेड्यात आयटी कंपनी उभी राहत असल्याचे समाधान त्यांना आहे.
Share your comments