1. यशोगाथा

मानलं लेका तुला….!! 12वी पास झाला अन शेती करायचं ठरवलं; आज वर्षाकाठी लाखों छापतोया

बारावी झाल्यानंतर मला शेती करायची आहे असे म्हणणारे आजच्या काळात सापडणे अवघडचं. कित्येक शेतकरीपुत्र आता शेतीला दुय्यम स्थानी ठेवत असल्याचे बघायला मिळतं आहे. मात्र हिमाचल प्रदेश मधील एका अवलियाने अगदी दहावी-बारावीपासूनचं शेती करायची असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. विशेष म्हणजे स्वप्नच नाही बघितलं तर ते प्रत्येक्षात देखील उतरवून दाखवलं.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
vegetable

vegetable

बारावी झाल्यानंतर मला शेती करायची आहे असे म्हणणारे आजच्या काळात सापडणे अवघडचं. कित्येक शेतकरीपुत्र आता शेतीला दुय्यम स्थानी ठेवत असल्याचे बघायला मिळतं आहे. मात्र हिमाचल प्रदेश मधील एका अवलियाने अगदी दहावी-बारावीपासूनचं शेती करायची असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. विशेष म्हणजे स्वप्नच नाही बघितलं तर ते प्रत्येक्षात देखील उतरवून दाखवलं.

हिमाचल प्रदेश मधील आनी मतदारसंघातील कराड पंचायतच्या पटारना येथील प्रेम ठाकूर यांनी अगदी लहानपनापासूनच शेती करण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होते बारावी पास झाल्यानंतर प्रेम यांनी शेती क्षेत्राकडे वाटचाल केली. त्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करून पंचक्रोशीत चांगले नाव कमावले आहे.

प्रेमने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि जिद्दीने राष्ट्रीय स्तरावर चांगले नाव लौकिक कमावले असून त्याला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून त्यांना बेस्ट फार्मर ऑफ हिमाचल 2017 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा अवॉर्ड त्यांना शिमला येथे मिळाला याशिवाय त्यांना 2019 मध्ये मेरठ येथे देखील एक नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Goat Rearing : प्रशिक्षण घेऊन शेळीपालन करण्यास सुरवात करा निश्चित होणार फायदा; वाचा कुठं घेणार प्रशिक्षण

Pineapple Farming : अननस शेती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर; बारामाही केली जाते लागवड

शिमला मंडीमध्ये प्रेम यांच्या मटरची ओळख त्यांच्या गावाच्या नावावरून होत असते. त्यांचे मटर पटरानां मटर म्हणुन प्रसिद्ध आहे. प्रेम ठाकूर यांनी गेल्या वर्षी 42 किलो वाटाणा पेरला होता. उत्तम शेतीसाठी प्रसिध्द असलेल्या प्रेम ठाकूर यांनी सिंचनाशिवाय 42 किलो मटरचे यशस्वी उत्पादन घेतले आणि त्यांना याबदल्यात 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळाले.

प्रेम ठाकूर सांगतात की, ते बटाटे, वाटाणा याशिवाय भाज्यांमध्ये कोबी आणि फ्रॉस्बीनचीही लागवड करत आहेत. तो पिकांच्या यशस्वी उत्पादनासाठी फक्त सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीटकनाशक वापरत आहे. निश्चितच सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादित करून प्रेम यांनी चांगले नावलौकिक कमवले आहे.

प्रेम ठाकूर पूर्णपणे सेंद्रिय शेती करत आहे. तो आपला पूर्ण वेळ शेतीसाठी देत ​​असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी योग्य वेळेत लागवड केली आणि योग्य व्यवस्थापन केले आणि वेळेनुसार खते, फवारण्या दिल्या तर चांगले उत्पादन मिळू शकते असे प्रेम सांगतो. प्रेम ठाकूर हे स्वतः सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असून परिसरातील शेतकऱ्यांनाही याबाबत जागरूक करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक जनजागृती शिबिरे आयोजित केली आहेत. प्रेम ठाकूर त्यांच्या भागातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

English Summary: Assuming you. !! Passed 12th and decided to start farming; Today millions are printed for the year Published on: 27 April 2022, 09:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters