आगामी काळात जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लोकसंख्या जशी वाढणार आहे, तशीच अन्नधान्याची मागणी देखील वाढणार हे स्वाभाविकच आहे. दुर्दैवाने अन्न धान्याची निर्मिती ही कोणत्याही कारखान्यात होत नाही, जमिनीत घाम गाळल्यानंतरच मातीतून बीज अंकुरते. अंकुरल्या बीजाला टपोर दाण्यांचे कणीस लागते.. बळीराजाच्या कष्टाला फळ येतं. थोडक्यात काय तर शेती समृद्ध झाली तर अन्न धान्याची वाढीव गरज पुर्ण होण्यास हातभार लागणार आहे, शेती आणि शेतकऱ्यांची नेमकी हीच गरज ओळखून जैन उदयोग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी ठिबक सारखे शेती क्षेत्रात क्रांती आणणारे तंत्रज्ञान भारतात आणले आणि शेती, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समृद्धीचे हसु पेरले. जैन उद्योग समूहाने पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि सिंचनातून समृद्धी आणली. जैन उदयोग समूहाचे उच्च कृषी तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर भारतातील बहुतांश शेतकऱ्यांची स्वीकारलेय.. या सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरलेय.. जैन इरिगेशन कंपनीने पाईप निर्मितीसह ठिबकसंच, स्प्रिंकलर, पीव्हीसी शिटस, टिश्यू कल्चर, फळप्रक्रिया आणि मसाले प्रक्रिया उद्योगात दमदार पाऊल ठेवले आहे.
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टी राखत शेतीच्या क्षेत्रात बदल घडविणारे निर्णय घेतलें. त्यांनी संपूर्ण आयुष्य शेती, शेतकरी आणि पाणी या गोष्टींसाठीच कार्य केले. त्यातही त्यांची प्राथमिकता शेती या विषयालाच होती. त्यामुळेच राजपत्रीत अधिकारी पदावर निवड होऊनही त्यांनी शासकीय नोकरी न स्वीकारता शेती उद्योगाला प्राथमिकता दिली. 1963 मध्ये अवघ्या 7 हजार रुपयांच्या कौटुंबिक बचतीचे बीज भांडवल उपयोगात आणून जैन ब्रदर्सची सुरवात झाली आहे. जळगाव येथून सुरु झालेल्या या कंपनीचा विस्तार आता जगभरात झालेला आहे. जैन इरिगेशनचे जगभरात 30 विविध उत्पादनांचे प्रकल्प कार्यरत आहेत. जगभरातील सर्व प्रकल्पांचे कामाचे तास पाहिले तर जैन इरिगेशनच्या कार्यक्षेत्रातील सूर्य कधी मावळतच नाही.
भवरलालजी जैन यांची शेती आणि शेतकरी यांच्यावर दृढ श्रद्धा राहिलेली आहे. जैन उदयोग समूहातील उत्पादीत वस्तू केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. पाणी अडवून त्याचे व्यवस्थापन करणे, अनुत्पादक जमिनीचा विकास, सेंद्रिय व जैविक खते आणि किटकनशाके यांचा योग्य प्रमाणात वापर, हरितगृहे निर्माण करणे, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वनीकरण करणे, फळे व भाज्यांवर प्रक्रिया व त्यांची निर्यात आणि मानव संसाधनाचे सशाक्तिकरण करणे या बाबत त्यांनी कुठलीही तडजोड न करता कार्य उभे केले आहे. थोडक्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून, कृषीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे, त्याचे मूल्यसंवर्धन करणे व भारतीय कृषीला जगात मानाचे स्थान मिळवून देणे हे त्यांचे उदिष्ट आहे.
करार शेतीचा पहिला प्रयोग
40 वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच पावसाच्या पाण्यावर, निसर्गाच्या लहरीपणावर शेती केली जात होती, प्रगत तंत्रज्ञान नव्हते त्यामुळे एकरी उत्पादकता कमी होती. त्यामुळे अन्न धान्य देखील आयात करावे लागले होते. या पद्धतीत बदल होत गेले. साधारणपणे 1970 ते 78 हा भारतातील कृषी क्षेत्रातला ‘हरितक्रांतीचा’ काळ मानला जातो. याच काळात जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी जैन ब्रदर्सच्या माध्यमातून खते, बी-बियाणे, जंतूनाशके, ट्रॅक्टर, पीव्हीसी पाईप, कृषी पंपांसाठी लागणारे क्रुड ऑईल आदि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचे वितरण विक्रीचे काम सुरू केले. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेतीक्षेत्राला प्रोत्साहन दिले आणि शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ‘हरितक्रांती’साठी तंत्रज्ञानाचा पुरस्कार करुन शेतीतील उत्पादकता वाढीसाठी अंमलबजावणीस सुरुवात केली. हा अनुकूल काळ विचारात घेता जैन इरिगेशनने पपेन लावगडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पपई उत्पादन करणारे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशचे सुमारे 2,500 हून अधिक प्रयोगशील शेतकरी जोडले गेले. यातूनच ‘करार शेती’चा भारतातील पहिला प्रयोग जैन इरिगेशनने यशस्वी करुन दाखविला.
पाईप निर्मितीच्या क्षेत्रात अग्रस्थानी
शेतकरी पूर्वी पाटचाऱ्याच्या पद्धतीने शेतीसिंचन करीत होते. त्यासाठी लोखंडी पाईप, सिमेंट पाईप वापरले जात असत. वापरायला कठीण, खर्चिक असलेल्या पाईप ऐवजी प्लास्टिकचे पाईप वजनाने हलके जोडायला सोपे असतात. त्यामुळे जैन इरिगेशनचा १९८० मध्ये पीव्हीसी पाईप बनविण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला देखील. पाटचाऱ्यांनी वाया जाणारे पाणी पाईपामुळे थोडे का होईना बचत होऊ लागले. शेतकऱ्यांनी देखील जैन पाईपचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला. अगदी लहान आकारातील पाईपापासून ते सगळ्यात मोठ्या आकारातील पाईपाचीनिर्मिती जैन इरिगेशन कंपनीत केली जाते. याशिवाय शहरातील गॅस वितरण करण्यासाठी लागणारी भक्कम अशी एचडीपीई आणि एमडीपीई पाईपींग सिस्टिम्स उभी करण्यात आली आहे. एचडीपीई पाईपांचा पुरवठा अगदी दुर्गम लेह-लडाख या भागात देखील सक्षमपणे केला गेला आहे. लेह-लडाख येथील रेमन मेगसेसे पुरस्कारप्राप्त सोनम वांगचुक यांच्या महत्वाकांक्षी आईस-स्तुपा प्रयोगात जैन इरिगेशनच्या एचडीपीई पाईप्सने महत्वाची भूमिका बजावली आहे.
ठिबक तंत्रज्ञानाची देणगी
पाण्याच्या बचतीसाठी अजून काही करता येऊ शकेल का? या प्रश्नाने जैन इरिगेशनची पाऊले उचलली जात होती, सततचे संशोधन सुरू देखील सुरू होते. जगभरात सिंचनाच्या क्षेत्रात काय तंत्रज्ञान आहे त्याचा अभ्यास सुरु झाला. याच काळात जगाला ज्यांनी ठिबक सिंचणाची देणगी दिली त्या इस्त्राईलचा दौरा देखील भवरलालजी जैन यांनी केला. तेथील उच्च तंत्रज्ञान पाहिले. 1982-83 मध्ये भारत सरकारने तुषार व ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिले. शेतकरी पाण्याच्या बचतीचा ठिबकचा मंत्र स्वीकारण्यास तयार झाले. 1988 मध्ये जैन इरिगेशनने भारतीय शेती आणि वातावरणास अनुकूल असे ठिबक सिंचनाने नवतंत्रज्ञान पुढे आणले. भारतात पहिल्यांदा ठिबक सिंचन आणण्याचे श्रेय भवरलालजी जैन यांनाच दिले जाते. आज देशभरातील असंख्य शेतकरी ठिबक सिंचनाच्या तंत्राशी जोडले गेले आहेत. कमी पाण्याच्या वापरात अधिक उत्पन्नाची हमी ठिबक मुळे शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आलेलं आपण पाहू शकतो. आज देशभरात जवळपास 85 लाख एकर क्षेत्रावर जैन ठिबकचे तंत्रज्ञान लावण्यात आले आहे.
टिश्यू कल्चरचे नवतंत्रज्ञान
सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत जैन इरिगेशनचे तंत्रज्ञ शेतीच्या क्षेत्रात संशोधन करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे टिश्यू कल्चर होय. उच्चप्रतीच्या पिकांवर संशोधन करून त्यापासून टिश्यू तयार केले जातात. हे टिश्यू प्रयोगशाळेत तयार करून त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रयोगशाळेत तयार झालेल्या टिश्यूकल्चरच्या पिकांवर रोग पडण्याचे प्रमाण जवळजवळ नाहीच. रोगमुक्त पिक आणि दुप्पट उत्पन्नाची खात्री असल्याने शेतकऱ्यांची टिश्यू कल्चर रोपांना अधिक मागणी आहे. जळगाव पासून जवळच असलेल्या टाकरखेडा येथील 90 हेक्टर क्षेत्रीतल टिश्यू कल्चर लॅबमध्ये केळी आणि डाळिंबाचे टिश्यू तयार केले जातात. याठिकाणी 100 दशलक्ष टिश्यू निर्मितीची क्षमता येथील प्रयोगशाळेची आहे.
शेती प्रक्रिया उद्योगातून समृद्धी
भवरलालजी जैन यांनी केवळ ठिबक सिंचनाचे संच विकले असे केले नाही तर त्यांनी अधिक उत्पादीत मालासाठी बाजारपेठेचा पर्याय निर्माण केला. त्यांनी शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे विविध उद्योग सुरू केलेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला चांगला हमी भाव देऊन शेतमालाची खरेदी केली जाते. 1995 मध्ये शेतकऱ्यांनी उच्च कृषि तंत्रज्ञानाचा स्वीकार केला होता. उत्पादन पूर्वीपेक्षा अधिक होऊ लागले. शेतीमाल हा शेवटी नाशवंत त्यावर प्रक्रिया होऊन मूल्यसंवर्धन होणे अगत्याचे होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन भवरलालजी जैन यांनी कांद्यावर प्रक्रिया करुन मूल्यसंवर्धन करण्यासाठी 1995 मध्ये जैन फूडपार्कला कांदा निर्जलीकरण प्रकल्प सुरु केला. कालांतराने या उद्योगाने चांगली उभारी घेतली. कंपनी आणि शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे स्थित्यंतर ठरले. 1995 नंतर गॅट करार आला. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. भारतीय शेतमालाची निर्यात आणि विदेशातला शेतमाल भारतात आयात होऊ लागला. आपल्याकडे असलेल्या कृषी प्रक्रिया उद्योगाला थोडी का होईना चालना मिळू लागली. जैन इरिगेशनच्या फळ प्रक्रिया प्रकल्पातून, कांदा व भाजीपाला निर्जलीकर प्रकल्पातून तयार होणारा मूल्यावर्धीत माल सातासमुद्रापार निर्यात होऊ लागला. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे खेळू लागले, प्रगतीसाठी शेतकऱ्यांना संधी मिळू लागली. जळगावची केळी विदेशात मिळू लागली असा महत्त्वपूर्ण बदल झाल्याने शेतकरी त्याचे लाभाचे धनी बनले.
मसाला प्रक्रिया उद्योगात दमदार पाऊल
जैन इरिगेशन कंपनीची उपकंपनी असलेल्या जैन फार्मफ्रेश फुडसने फळप्रक्रिया उद्योगात नवे प्रयोग केले आहेत. आता मसाले प्रक्रिया उद्योगाला सुरवात करण्यात आली आहे. मसाल्यांचा वापर भारतात खुप मोठ्या प्रमाणात केला जातो. नागरिकांना दर्जेदार, शुद्ध आणि उच्च गुणवत्तेचे मसाले मिळावेत यासाठी मसाला प्रक्रिया युनिट सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडुन कच्चा माल जसे ओली हळद, मिरची, आले, धने घेतले जाते. कच्चा माल वाळवण्याची प्रक्रिया देखील मसाले प्रक्रिया विभागातच केली जाते. त्यामुळे मसाल्यांच्या शुद्धतेची गुणवत्ता उंचावते. पेस्ट आणि पावडर स्वरुपात मसाले उपलब्ध असणार आहेत. मिरची, हळद, जीरे, धने, आले आदींवर प्रक्रिया केली जाते.
सौर उत्पादनांची साथ
आधुनिक होत असताना काही गोष्टी नागरिकांच्या मर्यादेबाहेर जात असल्याचे आपण पाहतो. जसे दिवसेंदिवस विजेचा भरमसाठ वापर सुरू असल्याने वीज निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भारनिमयनासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याउपाय म्हणुन सौर उर्जेकडे पाहिले जात आहे. सौर उर्जेचा वापर करून मानवी जीवन कसे सुखद करता येईल या दृष्टीने जैन उद्योग समुहाने सौर युनिटची उभारणी केली आहे. या माध्यमातून जैन उद्योग समुहाने सोलर पथदिवे, सोलर हिटर, सोलर कंदिल, सोलर सिग्नल, सोलर पंप या सारख्या उत्पादनांची मालिकाच सुरू केली आहे. विशेष म्हणजे खात्रीशीर उत्पादनांची ही मालिका ग्राहकांचे पुर्ण समाधान करणारी आहे. सोलर पंप तर शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरला आहे. ग्रामीण भागात भारनियमनाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना जैन सोलर पंप त्यासाठी वरदान ठरत आहे. पाणी असुनही विजे अभावी पिके कोरडी होताना शेतकऱ्यांना पहावे लागते. जैन सोलर पंपाच्या माध्यमातून शेतीला पाणी देणे सहज, सोपे आणि सुलभ झाले आहे.
बायोगॅसपासून वीज निर्मिती
जैन फार्मफ्रेश फुडसच्या माध्यमातून फळप्रक्रिया केली जाते. कांदा निर्जलीकरणासह केळी, आंबा, पेरू यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया झाल्यानंतर उरणाऱ्या वेस्टेजपासून बायोगॅस निर्मिती केली जाते. त्यामुळे वर्षाकाठी साधारणपणे 2,789 मेगॅवॉट वीज निर्मिती केली जाते. पूर्णपणे निसर्गपुरक साधनांनी तयार झालेली ही वीज कंपनीच्या विविध आस्थापनांत वापरली जाते.
प्लम्बींग विभागाची कामगिरी
केवळ पाईपाची निर्मिती करून जैन इरिगेशन कंपनी थांबली नाही तर पाईप जोडणीचे पूर्ण तंत्रज्ञान कंपनीने विकसीत केले आहे. इमारती आणि बांधकाम उद्योग, निवासी आणि व्यावसायिक कॉम्प्लेक्स, टाउनशिप, उंच इमारती, रुग्णालये, औद्योगिक पाईपलाईन, आदी ठिकाणी फिटींग केले जाते. यूपीव्हीसी पाइपलाइन पाईप्स, फिटिंग्ज (साध्या आणि थ्रेड केलेले) घरगुती/निवासी/व्यावसायिक/औद्योगिक आणि उच्च दाब थंड पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या आकारात ½ "ते 12" या व्यासांपर्यंत पाईपांचा पुरवठ केला जातो. पिण्याचे पाणी घरात पुर्णपणे शुद्ध स्वरुपात यावे यासाठी जंग प्रतिरोधक, जीवाणू वाढ न होणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या पाईपांची निर्मिती केली जाते. 160 एमएम ओडीडीसाठी क्लिप रिंग संयुक्त प्रकारात उपलब्ध आहे. एसडब्ल्यूआर फिटिंग्ज (75 मिमी ते 160 मिमी ओडी) डीआयएन 19531/19534 शी देखील जुळतात. हे पीव्हीसी पाईप हल्के, मजबूत, आणि दिर्घायुषी असून आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहेत.
प्लास्टिक शिटस विभाग
जैन इरिगेशन कंपनी आज भारतातील सर्वात मोठ्या पॉलिमर प्रोसेसरपैकी एक आहे. यूपीव्हीसी, पीई, पीसी तसेच पॉलिप्रोपलीन, पॉलिस्टिरिन, पॉलिसीटल आणि नायलॉन इत्यादी पॉलिमरसह दरवर्षी 3,00,000 दशलक्ष मेट्रिक टन शिटस बाहेर काढले जातात आणि इंजेक्शन मोल्ड केले जातात. गेल्या 14 वर्षाच्या कालावधीत प्लास्टिक शिटस विभागाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या प्लास्टिक शिटसचा उपयोग घरांचे सुशोभिकरण, साईनबोर्ड यासाठी प्रामुख्याने केला जातो. रुंदी 1220,1560, 2050 मिमी आणि लांबी 2440 मिमी 2 मि.मी. ते 30 मि.मी. या आकारात शिटस् तयार केले जातात. शिवाय हे शिटस अग्नीरोधक असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहेत. घरातील अंतर्गत सजावटीसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
भवरलाल ॲन्ड कांताबाई फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीने केवळ उद्योगाच्या विस्ताराकडे लक्ष दिले असे नाही तर सामाजिक बांधिलकीचा वसाही जोपासला आहे. समाजाचे आपण देणं लागतो ही भावना भवरलालजी जैन यांनी त्यांच्या चारही मुलांसह कंपनीच्या सर्वच सहकाऱ्यांच्या मनात रुजवली आहे. त्यानुसार भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, जैन स्पोर्टस्, गौराबाई कृषि उच्च तंत्रविद्यालय आदी प्रकल्पांसोबतच शैक्षणिक, साहित्यिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सेवाभावी कार्य करत आहे. जैन हिल्सच्या परिसरात महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भव्य असे संग्रहालय उभारण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिला बचतगटांसाठी कृषीपुरक शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, सुत कताईला चालणा देणे, खादी कापड व वस्त्रांची निर्मिती करणे यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांनी साध्या सोप्या शब्दांतून जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. त्यांचे साहित्य, कविता नव्या पिढीपर्यंत पोहचाव्यात यासाठी युवा कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. बहिणाबाईंच्या नावे ठरविण्यात आलेल्या द्विवार्षिक पुरस्काराचे वितरण कालमर्यादेत केले जाते.
खानदेशसारख्या ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, त्यांच्या अंगी असलेली क्षमता व क्रीडा कौशल्य वाढण्यासाठी त्या त्या खेळातील तज्ज्ञांना बोलवून त्यांच्यामार्फत योग्य ते प्रशिक्षण देणे, तसेच येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहचू शकतील यासाठी प्रयत्न केले जातात. भवरलालजी जैन नेहमी म्हणत ‘अनुभूती’ शाळेतून नोकरी करणारी विद्यार्थी न घडवता नोकरी देणारी विद्यार्थी घडवले जायला हवे’. अनुभवाधारित शिक्षण प्रणालीतून जीवन घडविणाऱ्या खऱ्या शिक्षणाला कटीबद्ध होत विद्यार्थ्यांची आयसीएससी निवासी शाळेव्दारे जडण-घडण करणे. भारतीय संस्कृतीच्या जपणूकीतून त्यांच्या अंगी उद्योजकता विकासित व्हावी यासाठी शालेय शिक्षणासमवेत भर दिली जातो. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अनुभूती इंग्लिश मिडीयमची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलांना शेती विषयी गोडी निर्माण व्हावी, शेतीतील उच्चतंत्रज्ञान मुलांना कळावे यासाठी वाकोद येथे गौराई कृषी तंत्रनिकेतन सुरू करण्यात आले आहे. नेत्र विकारांवर वेळीच योग्य चिकित्सा व्हावी यासाठी सर्व अद्ययावत यंत्र सामृग्रीच्या माध्यमातून व यातील तज्ज्ञांकडून डोळ्यांच्या तपासणीसह माफक दरात कांताई नेत्रालयात उपचार केले जातात. ग्रामीण भागातील गोरगरीब असणाऱ्या बालक व ज्येष्ठ नागरिकांना तपासणीसाठी विशेष सहाय्य येथे केले जाते.
जैन उद्योग समुहाचा विस्तार
- सातहजाराच्या भांडवलावर जैन उद्योग समूहाची सुरवात.
- आज जगभरात कंपनीची कार्यालये.
- जगभरात 33 कारखाने.
- भारतासह अमेरिका, मेक्सिको, ब्राझिल, चिली, इंग्लंड, स्पेन, टर्की, इस्राईल, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया येथे प्रकल्प.
- जगभरात 146 कार्यालये व डेपो.
- 11 हजार वितरकांच्या भक्कम जाळ्यासह 12 हजाराहून अधिक सहकारी असलेली बहुराष्ट्रीय कंपनी.
- वार्षिक उलाढाल 8,000 कोटींच्या वर.
- आंबा फळप्रक्रियेत जगात पहिले.
- केळी आणि डाळींबच्या टिश्यू रोप निर्मितीत जगात पहिले.
- सौर कृषीपंप निर्मितीत जगात पहिले.
- कृषी पाईपांसहित ठिबक सिंचन उत्पादनात जगात पहिले.
पुरस्कार व सन्मान
- आंतराष्ट्रीय 14, राष्ट्रीय 146, राज्यस्तरीय 45, राष्ट्रीय स्तरावरील गौरवान्वित संस्था 79.
- आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील गौरवलेल्या संस्थेव्दारे मानांकन 17.
- राष्ट्रीय प्रतिष्ठीत व्यक्तिंव्दारा गौरव 4.
- एकुण मिळालेले पुरस्कार 305.
- फॉर्च्युन मासिकाच्या ‘चेंज द वर्ल्ड 2015’च्या यादीत जगातील 51 कंपन्यांमधुन सातव्या स्थानाचा बहुमान प्राप्त करणारी ‘जैन इरिगेशन’ही एकमेव भारतीय कंपनी.
श्री. दिनेश दीक्षित
9404955245
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.
Share your comments