मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शेतकरी आकाश चौरसिया कपुरीया गावात सेंद्रिय शेती करत आहे. पण आकाशने शेती करीत असताना शेतीतील झाडं पानं, फुल पिक जीवजंतूंना म्युझिक थेरपी देतोय म्हणजेच तो आपल्या फार्म हाऊस मध्ये म्युझिक सिस्टीम लावून या सिस्टीम द्वारे आपल्या शेतातील झाडांना गायीला आणि जीवजंतूंना म्युझिक ऐकवतो. यामुळे पिकांमध्ये अधिक उत्पादन मिळत असून सेंद्रिय खत खाद्य लवकर तयार होत आहे, यामुळे गाय ही अधिक दुध देत असल्याचं सांगण्यात आला आहे. ऐकून विश्वास बसणार नाही पण ते खर आहे.
आकाशने दिलेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे माणूस तणावात असतो, त्याचप्रमाणे झाडं पाणी तणावात असतात. त्यामुळे म्युझिक थेरपीद्वारे त्यांना दूर करण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या आवाज ऐकले जातात. जसे गायत्री मंत्र, भुंग्याचा आवाज इत्यादी विविध प्रकारचे आवाज झाडाच्या अवस्थेनुसार दिले जातात. ज्यावेळी बियाण्यावर काम सुरू असतं तेव्हा गायत्री मंत्र ऐकवला जातो. बियाणे मधून पीक वर येताना भुंग्यांचा आवाज ऐकला जातो. जेव्हा फळ अवस्थेत पिके येतं तेव्हा त्याला गायत्रीमंत्राचे थेरपी दिली जाते.. आकाशाच्या म्हणण्यानुसार या म्युझिक थेरपी मुळे 30 टक्के अधिक उत्पादन होत. सेंद्रिय खत बनवण्यासाठी गांडूळ नव्वद दिवसांचा वेळ घेतात परंतु रात्री त्यांना म्युझिक थेरपी दिल्यास गांडूळ तेवढेच खत केवळ साठ दिवसात पूर्ण करतात. गाय गर्भावस्थेत असताना गाईला गायत्रीमंत्राचे थेरपी दिल्यानंतर गायही एक ते दीड लिटर दूध अधिक देते.
केंद्रीय विद्यापीठाचे माजी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर अजय शंकर मिश्रा यांच्याशी चर्चा करण्यात आली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की एकशे वीस वर्षांच्या संशोधनातून आढळून आला आहे की जातीच्या संवेदनशील असतात आणि त्यांना संगीत जाणवते. क्लासिकल म्युझिक ऐकवल्या झाडांमध्ये चांगली प्रगती होते. हा सिद्धांत आधीपासून प्रस्तावित आहे. पुढे त्यांनी सांगितले की 1902 मध्ये संशोधक जी.सी. बसू यांना संशोधनात हे आढळले होते. आता आकाश कडे देशातील विविध राज्यातील शेतकरी ट्रेनिंग घेण्यासाठी येत असतात.
Share your comments