कोरोनाचा कालखंड हा सर्व लोकांसाठी वाईट काळ ठरला. कोरोनाचा अनेक व्यवसायावर परिणाम झाला. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले. अनेक तरुणांना नोकरी गमवावी लागली. अनेकांना नोकऱ्या लागल्या नाहीत. कोरोनामुळे अनेक तरूणांच्या पदरी निराशा पडली आहे. या परिस्थितीत हताश न होता अमरावतीमधील किरण इंगळे याने पुर्णवेळ शेती करण्याचं धाडस देखील केले आहे. या युवा शेतकऱ्याने शेतीत भन्नाट प्रयोग केले आहेत.
किरण इंगळे हा युवक अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील असून त्याने वयाच्या 24 व्या वर्षी शेतीत अनोखा प्रयोग केला आहे. शेतातून लाखोंचं उत्पादन काढल्यानं त्याचे अमरावती जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. पारंपारिक शेती सोडून बागायती शेती केल्यानंतर किती फायदा होतो हेही तरूणांनी राज्यातल्या अनेकांना दाखवून दिले आहे. याबद्दल शेतकऱ्यांने किरणचे कौतुक केले आहे.
अवघ्या २४ वर्षाचा शेतकरी
किरण इंगळे हा शेतकरी अवघ्या २४ वर्षाचा आहे. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथे राहणारा आहे. किरणने शेतात पारंपारिक पद्धतीने शेती न करता ४ हेक्टरवर पालेभाज्या पिकांची लागवड केली. शेतीची आवड असल्याने किरणने १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण केले. शेतात मेहनत घ्यायला सुरुवात केली.
२० लाख विक्रमी उत्पन्न
शेतीत त्याने टमाटर, वांगे, संत्रा,चवळी, मिरची,गोबी,कांदा अश्या विविध पालेभाज्यांची लागवड केली आहे. यातून आतापर्यंत किराणला १० लाखांचं उत्पादन झालं आहे. यंदा किरणला २० लाखांच उत्पादन होऊ शकत असा अंदाज व्यक्त केलाय.
आधुनिक शेती फायद्याची असून आता काळाची गरज बनली आहे. पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक पद्धतीने शेती शेती केली तर नक्कीच फायदा होतो. किरण इंगळे याने महाराष्ट्रातील तरूण शेतकऱ्यांना एक आदर्श घालून दिला आहे.
अधिक वाचा : आनंदाची बातमी: "या" कर्मचाऱ्यांना होळीच्या दिवशी मिळणार पैसे
Share your comments