सध्या शेतकरी विविध प्रकारची पिके शेतांमध्ये घेऊ लागले आहेत. या विविध पिकांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे उत्तम पद्धतीने उत्पादन देखील घेत आहेत.परंपरागत पिकेघेणे तितकेसे आर्थिक फायद्याचे होत नसल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांकडे शेतकरी वळत आहेत.
अगदी स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काही शेतकऱ्यांनी सफरचंदाचा देखील यशस्वी प्रयोग केला आहे.अशाच प्रकारचा हटके प्रयोग नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याच्या यशस्वीतेबद्दल या लेखात माहिती घेऊ.
वासोळ येथील शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग
नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील देवळा तालुका म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते ते कांदा पीक आणि मकाजर आपण कसमादे पट्ट्या मधील सटाणा आणि देवळा तालुक्याचा प्रामुख्याने विचार केला तर येथील शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात कांदा हेच पीक घेतात आणि त्याखालोखाल नंबर लागतो तो मका या पिकाचा. परंतु याच देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकरी जिभाऊ भगवान देसले यांनी कांदा या पिकाला फाटा देत त्यांच्या शेतामध्ये रंगीबिरंगी फुलकोबी चा प्रयोग यशस्वीरित्या साकारला आहे.
त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वीस गुंठे क्षेत्रावर रंगीबिरंगी फुल कोबीची उत्पादन घेतले असून ग्रामीण भागामध्ये त्याची खूप नवलाई वाटत आहे.अशा या जिभाऊ देसले यांनी रंगीत फुलकोबी लावल्याने परिसरातून शेतकऱ्यांची रंगीबिरंगी कोबी बघण्यासाठी गर्दी होत आहे. जर रंगीबिरंगी फुलकोबी चा बाजारपेठेचा विचार केला तर या फुलकोबी ला मोठ्या शहरांमध्ये, फाईव्ह स्टार हॉटेल्स तसेच इतर छोट्यामोठ्या शहरांमध्ये देखील चांगल्याप्रकारे मागणी आहे. रंगीबिरंगी फुल कोबीची लागवड कशी करावी याबाबतची माहिती देसले यांचा मुलगा हितेंद्र व त्यांचा पुतण्या हेमंत यांनी गुगलवर सर्च करून तसेच या कोबी वाना बद्दल संपूर्ण माहिती मिळवली. परंतु त्यांना या कोबीचे बियाणे सहसा उपलब्ध होत नव्हते. परंतु बऱ्याच प्रयत्नांती देसले यांचा सिजेंटा या कंपनीच्या एका वर्कर सोबत ओळख झाल्यानंतर त्यांना लागवडीसाठी पाच ग्रॅम ची पुड्याचे अठरा नगदेसले यांनीप्रति नग पाचशे रुपये प्रमाणे खरेदी केले. या रंगीबेरंगी फुल कोबीची लागवड त्यांनी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली.
या कोबीला परिपक्व होण्यासाठी 75 ते 85 दिवस लागतात. सद्यस्थितीत ही कोबी साधारण 25 ते 30 रुपये प्रति किलो या भावाने विकले जात आहे. जिभाऊ देसले यांना वीस गुंठे साठी जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये खर्च आला आहे. त्यांनी या 20 गुंठ्यांतून आतापर्यंत चार टन रंगीत कोबीचे उत्पन्न घेतले असून अजून दोन टन उत्पन्न मिळू शकते असा त्यांचा विश्वास आहे. स्थानिक बाजारपेठेमध्ये या फुलकोबी त्याला थोड्या अडचणी येत असल्याने जिभाऊ देसले यांनी त्यांची कोबी थेट मुंबई येथील वाशी मार्केट आणि गुजरातमधील वाफी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत.
Share your comments