सांगली जिल्ह्यातील तिसंगी येथील एका शेतकऱ्याने एक एकरमध्ये १४ तोड्यात ५३ टन उत्पादन घेतले आहे. बाजारात दर जर टिकून राहिले तर अजून प्लॉट टिकवून त्याचा वाढदिवस घालण्याची त्याची ईच्छा आहे. या जिगरबाज शेतकऱ्याचे नाव शिवाजी शिंदे असे आहे जे की त्याने ढोबळी मिरची, टोमॅटो चे उत्पादन घेतले आहे. जुन्या ढोबळी मिरचीच्या पायाभूत यंत्रणेवर बिन्स चे वेल चढवून त्यांनी विविध प्रयोग केले आहेत जे की या शेतकऱ्याच्या यशस्वी प्रयोगामुळे तेथील शेतकरी सुद्धा त्याच्याकडून प्रेरणा घेत आहेत.
आतापर्यंत निघाले १४ तोडे तरी प्लॉट शिल्लकच :-
शिवाजी शिंदे यांना सर्व मिळून १४ एकर जमीन आहे जे की ११ एकर मध्ये ते इतर पिके घेतात तर ३ एकर शेतीमध्ये ते नेहमी फळभाजीची लागवड करत असतात. शिवाजी शिंदे यांनी वृषाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै २०२१ रोजी इंडस - 11 या ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली. या जातीची सुमारे १७००० रोपे त्यांनी लावली होती. आता पर्यंत त्याचे १४ तोडे झाले असून यामधून त्यांना ५३ टन उत्पादन निघाले आहे. जर बाजारात दर टिकून राहिले तर प्लॉट चा वाढदिवस च साजरा करेन अशी ईच्छा त्यांनी मांडली आहे. याचे कारण म्हणजे या प्लॉट मधून त्यांना फक्त ४० टन उत्पादनाची अपेक्षा होती पण पहिल्याच तोडीमध्ये त्यांना ५३ टन उत्पादन निघाले आहे त्यामुळे शिवाजी शिंदे खूप खुश आहेत. बाजारात किमान २८ रुपये दर आहे तर कमाल ५३ रुपये दर मिळालेला आहे.
ढोबळीच्या जुन्या रोपांवर चढवली बीन्सची वेल :-
एका प्लॉटमध्ये जुनाट ढोबळी मिरची होती जे की तो प्लॉट खराब असल्यामुळे त्या प्लॉटमध्ये त्यांनी मल्चिंग, खते व बांधणी चा वापर करत बिन्स ची लागवड केली आणि त्याचा वेल ढोबळी मिरचीवर चढवला. शिवाजी शिंदे यांनी अलेक्स हे औषध बिन्स साठी वापरले आणि जुन्या प्लॉटमध्ये त्याची लागवड करून १६ टन बिन्स चे उत्पादन काढले आहे. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे जुन्या ढोबळी मिरचीचे मल्चिंग, ड्रीप, खते तसेच जुनी रोपे आणि बांधणी यांचा वापर केला आणि यामुळे त्यांचा दीड लाख रुपयांचा खर्च वाचला.
अलेक्सची कमाल धमाल :-
शिवाजी शिंदे यांनी अलेक्स-99 हे औषध वापरून चांगला रिझल्ट अनुभवला आहे. जे की अलेक्स - 99 हे वीरा अॅग्रोचे क्रांतिकारी प्रॉडक्ट आहे. शिवाजी शिंदे सांगतात की २० - २५ मिरचीचे एका जागीच सेटिंग झालेले मी प्रथमता पाहिले जे की ही कमाल अलेक्स 99 या औषधाने दाखवली आहे. अलेक्स 99 सोबत त्यानी आयबी सुपर, मेरिट अशी उत्पादने सुद्धा वापरली असून ते प्रभावी ठरले आहेत. दोन एकरात बिन्स तसेच टोमॅटो ची लागवड केली. जेके-811 या जातीच्या टोमॅटो ची लागवड केली असून पाच महिने दराने साथ दिली. शिवाजी शिंदे यांना यामधून 25 टन उत्पादन निघाले आहे जे की सुरुवातीला त्यांना प्रति किलो ४० रुपये असा दर मिळाला आहे.
Share your comments