Strawberry Farming| कोणत्याही क्षेत्रात आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले जाऊ शकते. मग तो व्यक्ती उच्च शिक्षित असो किंवा कमी शिकलेला असो. याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते उत्तर प्रदेश मधून. उत्तर प्रदेश राज्यातील इटावा जिल्ह्याच्या एका महिलेने कमी शिक्षण घेतलेले असतानाही शेती क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे.
जिल्ह्यातील जसवंतनगर तालुक्याच्या मौजे नगला भिकन येथील रहिवासी 42 वर्षाच्या शेतकरी मंत्रवती फक्त आठवी पास आहेत. आठवी पास असून देखील या महिलेने आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि अभ्यासू वृत्तीमुळे शेतीमध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
या महिला शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. मंत्रवती यांना कृषी विभागाकडून स्ट्रॉबेरी शेतीची माहिती मिळाली, कृषी विभागाकडून स्ट्रॉबेरी शेतीची अनमोल माहिती तर मिळालीच शिवाय स्ट्रॉबेरीची 480 रोपे देखील त्यांना देण्यात आली. कृषी विभागाकडून 480 स्ट्रॉबेरीची रोपे मिळाल्यानंतर मंत्रवती यांनी या रोपांची लागवड केली. लागवड केल्यानंतर कृषी विभागाच्या सल्ल्याने स्ट्रॉबेरी शेतीत योग्य नियोजन केले.
योग्य नियोजन करून या महिला शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली. स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून या महिलेने स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतले. या महिलेने उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी 800 रुपये प्रति किलो या दरात विकली गेली.
यामुळे या महिलेचे चांगले उत्पन्न मिळाले. स्ट्रॉबेरीची लागवड करून मंत्रावतीने परिसरात नाव कमावले असून आता इतर महिलाही मंत्रावतीपासून प्रेरणा घेत आहेत. या महिला शेतकऱ्यास शेतीमध्ये त्यांच्या पतीचे आणि त्यांच्या परिवाराचे विशेष सहकार्य लाभले.
त्याच्या जोरावरच आपण हे यश मिळवले असल्याचे देखील ते सांगत असतात. एकंदरीत मंत्रवती त्यांच्या गावातील तसेच पंचक्रोशीतील महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहेत. सध्या ही महिला शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहे.
संबंधित बातम्या:-
Share your comments