नेवासा तालुक्यात आंतरवाली गावात राहणारे अंकुश कानडे हे एक रहिवासी. अंकुश यांनी मागील २० वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी सोडून देशी कुक्कुटपालन व्यवसाय चालू केला होता. सुरुवातीस त्यांनी हा व्यवसाय फक्त २२ कोंबड्या वर चालू केला होता मात्र आज त्यांनी या व्यवसायात यशाचे शिखर गाठले आहे. राज्यात देशी कोंबड्यांची पैदास करणारा सर्वात मोठ्या व्यवसाय म्हणून याना ओळखलं जातं. अंकुश कानडे यांनी सुरुवातीस चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करून अंडी, चिकन व ब्रिडिंग फार्म असा विस्तार केला आणि आजच्या घडीला वर्षाला कानडे पाच कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.
राज्यभरातून त्यास मागणी आहे:
जिल्हा परिषद शाळेत कानडे नोकरी करत होते मात्र व्यवसाय करण्याची इच्छा मनात होती. १९९७ मध्ये कानडे यांनी ब्रॉयर कोंबडी पासून कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तो बंद पडला. त्यानंतर त्यांनी बाजारातून दोन हजार देशी कोंबड्या आणून पालन सुरू केले.प्रति कोंबडी चे चार महिने संगोपन करण्यासाठी ३५ रुपये खर्च येतो जे की यामधून त्यांना चांगले उत्पन्न भेटू लागले व व्यवसाय वाढवण्याची ईच्छा सुरू झाली. कानडे यांनी महाराष्ट्र मधील देशी कोंबडी व दक्षिण मधील देळशी कोंबडी याचे ब्रीड तयार केले आणि नवे संशोधनला सुरुवात केली. कानडे यांनी देशी कोंबडी ची चव असणारा चैतन्य गावरान क्रास असा ब्रँड तयार केला जे की आज राज्यभरातून त्यास मागणी आहे.
वाचा हेही :भारताचा ‘मँगो मॅन’; एकाच झाडावर ३०० आंब्याच्या प्रजाती, राष्ट्रपतींनी चाखली चव
कसा उभारला उद्योग?
सुरुवातीस पोल्ट्री उभा करण्यास दोन लाख रुपये खर्च झाले नंतर अंडी उबवणारी यंत्रणा दिल्लीतून मागवली त्यासाठी दोन लाख रुपये गेले. बाजारपेठेतुन देशी अंडी खरेदी केली तसेच तीन हजार पिल्लाचे संगोपन केले.मुंबई मार्केट मध्ये ज्यावेळी कोंबड्यांची विक्री केली त्यावेळी त्यांना प्रति कोंबडी ८१ रुपये ने भाव मिळाला त्यामध्ये त्यांना एक लाख रुपये नफा मिळाला. तसेच वर्षभरात तीन वेळा तीन हजार कोंबड्यांचे जे पालन केले त्यामधून तीन लाख रुपये मिळाले. त्या मिळालेल्या नफ्यातून त्यांनी चांगल्या प्रकारे गुंतवणूक केली. त्यांचा मुलगा बीएससी अॅग्री आणि एमबीए मार्केटिंग झाला आहे त्याने या व्यवसायाला व्यासायिक स्वरूप दिले.
परदेशी कंपनीसोबत कामाला सुरुवात:-
२००६ साली थायलंड मधील एका कंपनीसोबत व्यवसाय सुरू केला जे त्या कंपनीला प्रति महिना ४ लाख उबवून अंडी पाहिजे होत. कंपनीने तशी क्षमता असणारे यंत्र खरेदी करण्यास आधीच १० लाख रुपये रक्कम सुद्धा दिली त्यामधून कानडे यांनी १६ लाख रुपयांचे नवीन यंत्र घेतले. सुमारे चार वर्षे काम केल्याने त्यांना चांगला फायदा सुद्धा झाला.
शेतीपूरक व्यवसाय गरजेचा:-
आजकाल शेतकरी पारंपरिक शेती न करता शेतीसाठी पूरक व्यवसाय पाहत आहे. आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन नवीन यंत्र आणून त्याचा वापर केला पाहिजे असे कानडे याचे मत आहे.
Share your comments