
Cucumber farming
शेतीमध्ये सध्या दिवस बदलत चालले आहेत. अनेक शेतकरी हे वेगवेगळ्या पद्धतीने पिके घेऊन चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांनी नवीन सुधारित आणि प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीतून अधिक उत्पादन मिळवता येते.
औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील शेतकरी बंडू नारायण पडूळ यांनी देखील शासकीय योजनेचा लाभ घेत प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतून चांगली कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे त्यांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देण्यासाठी शेडनेट हाऊस मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थातच पोखरा योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेत आपल्या 40 गुंठे शेत जमिनीत शेडनेटची उभारणी केली.
'ऊसतोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा'
सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्याचा लाभ शेतकरी घेत नाहीत. मात्र या शेतकऱ्याने महाराष्ट्र शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ घेतला आहे.
त्यांनी आपल्या चाळीस गुंठे शेत जमिनीत उभारलेल्या शेडनेट हाऊस मध्ये वीस गुंठ्यात काकडीची आणि वीस गुंठ्यात शिमला मिरचीची लागवड केली आहे.
त्यांना काकडीच्या पिकातून जवळपास 25 टन उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यांच्या काकडीला सध्या स्थितीत 28 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.
शेतकऱ्यांनो बँकांनी सिबिल विचारलं तर थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करा
शेडनेट हाऊसची उभारणी झाल्यामुळे त्यांनी आपल्या शेतात दहा ते बारा महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनाचा प्रश्न देखील त्यांनी सोलार पंप बसवल्यामुळे मिटला आहे.
शेतकरी बांधवांनी शासकीय योजनेची माहिती घेऊन अनुदानाचा लाभ घेत अशा प्रगत तंत्रांचा वापर केला तर चांगला फायदा होतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात.
महत्वाच्या बातम्या:
'आता प्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम दुप्पट करणार'
महावितरणची नवीन शाळा! ट्रान्सफॉर्मर बदलायचाय मग वीज बिल भरा..ऑस्ट्रेलियातून ५१ हजार टन कापूस आयात, शेतकऱ्यांसह संघटनांनी संताप व्यक्त, आयात शुल्कही माफ
Share your comments