पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन कार इत्यादींकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून यामध्ये इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कार तयार करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शंभर टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या टोयोटा कंपनीच्या इनोव्हा हायक्रॉस कारचे आज अनावरण केले. ही जगातील पहिली इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन वाहनाचा प्रोटोटाईप आहे.
ही कार हायब्रीड प्रणालीची असल्यामुळे इथेनॉल इंधनापासून 40% विज तयार करण्याची यामध्ये क्षमता असून आपण इथेनॉल ची किंमत पाहिली तर ती 60 रुपये प्रति लिटर इतके आहे. त्यामुळे पेट्रोल पेक्षा कितीतरी फायदेशीर ही कार ठरणार आहे. सध्या पेट्रोलचे दर हे काही ठिकाणी शंभर ते काही ठिकाणी शंभर रुपयांच्या पार आहेत.
इथेनॉल इंधन कारचा फायदा कसा होईल?
1- खर्च कमी- इथेनॉल इंधनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची किंमत ही होय. याचा विचार केला तर 60 रुपये प्रति लिटर इथेनॉल मिळत असून पेट्रोलच्या तुलनेत ते खूप परवडणारे आहे. लॉन्च होणारी ही कार पंधरा ते वीस किलोमीटरचे मायलेज देऊ शकते.
2- पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर- पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे पेट्रोलच्या वापराने जे प्रदूषण होते ते कमी होण्यास मदत होणार आहे. याचा वापर करून वाहने पस्तीस टक्के कमी कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित करतात. इथेनॉल हे सल्फर डायॉक्साईड आणि हायड्रोकार्बनचे उत्सर्जन देखील कमी करते.
3- इंजिनचे आयुष्य वाढते- इथेनॉल किंवा इथेनॉल मिसळून चालणाऱ्या वाहनाला पेट्रोल पेक्षा खूप कमी उष्णता मिळते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे लवकर बाष्पीभवन होते व त्यामुळे इंजिन लवकर गरम होत नाही व इंजिनचे आयुष्य वाढते.
4- शेतकऱ्यांना देखील होईल फायदा- इथेनॉलचा वापर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढवण्यास मदत होणार आहे. कारण इथेनॉल हे ऊस, कॉर्न तसेच इतर अनेक पिकांपासून तयार केले जाते. तसेच साखर कारखाना देखील उत्पन्नाचा एक नवा स्त्रोत इथेनॉलच्या माध्यमातून मिळणार असून त्यांच्या देखील उत्पन्नात वाढ होणार आहे. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना जवळजवळ 21000 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
5- सरकारला देखील होईल फायदा- इथेनॉलमुळे पेट्रोलियम पदार्थांचा आयातीवरचा खर्च वाचू शकतो. भारताला जर स्वावलंबी व्हायचे असेल तर तेलावरच्या त्यावरील खर्च कमी करणे गरजेचे आहे असे एका कार्यक्रमांमध्ये गडकरी म्हणाले होते. सध्या यावर 16 लाख कोटी रुपये खर्च होतो. त्यांना वापरामुळे हा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
इथेनॉलचे तीन प्रकार
1- 1 जी इथेनॉल- या प्रकारचे इथेनॉल हे पहिल्या पिढीतील असून ते प्रामुख्याने उसाचा रस, गोड बीट तसेच कुजलेले बटाटे तसेच गोड ज्वारी आणि मक्यापासून बनवले जाते.
2- 2 जी इथेनॉल- हे दुसऱ्या पिढीतील इथेनॉल असून सेल्युलोज आणि लिग्नो सेल्युलोसिक पदार्थांपासून बनवले जाते. प्रामुख्याने तांदूळ तसेच गव्हाची भुसी, कॉर्नकोब, बांबू आणि बायोमास पासून बनवले जाते.
3- 3 जी जैवइंधन- ही तिसऱ्या पिढीचे जैवइंधन असून ते शैवाला पासून बनवले जाणार आहे परंतु त्यावर अजून काम सुरू आहे.
Share your comments