सध्या लोक डिजिटल पेमेंटच्या युगामध्ये सोबत कॅश बाळगत नाहीत. आपण पाहतो कीप्रत्येक जण छोटे-मोठे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड शोधतात.
परंतु आपण कधी याबाबत विचार करतो का की क्यू आर स्कॅन केल्यानंतर तुमचे अकाउंट मधील पैसे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये जाऊ शकतात? त्यामुळे याबाबत माहिती असणे फार गरजेचे आहे. आपण पाहतो की सध्या ऑनलाईन फ्राडच्या केसेस दिवसेदिवस वाढत आहेत. त्यामुळे या पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानेबँकेच्या ग्राहकांसाठी एक नोटिफिकेशन जारी केले आहे.बँकेने क्यू आर स्कॅनर च्या माध्यमातून होणाऱ्याफसवणुकीपासून सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.
नक्की वाचा:Bullet Lovers! Royal Enfield बनवणार इलेक्ट्रिक बाईक, भन्नाट फीचर्स आणि दमदार रेंजची चर्चा
QR कोड नेमका काय असतो?
QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोडहोय.आपल्याला बारकोड माहिती आहेच त्या सारखाच हा एक कोड असतोत्यावर काहीही लिहिलेले नसते. यावर एक काळ्या रंगाचा पॅटर्न असतो. या कोडच्या मागे URL embeded असतो. जेव्हा आपण हा कोड आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्कॅन करतो तेव्हा या URL embeded बद्दल माहिती पडते. हेच आपल्यालाकोड स्कॅन केल्यानंतर एखाद्या वेबसाईटच्या URL सोबत कनेक्ट करून देते. या माध्यमातून QR फिशिंग होते.

QR फिशिंग नेमके काय?
जो पॅटर्न कोड आपण क्यूआर कोड मध्ये पाहतो. यामध्ये युजर चे अकाउंट रिलेटेड डाटा सेव्ह होऊन जातो. ज्या वेळेस तुम्ही मोबाईल फोनच्या माध्यमातून कोणत्याही कोड स्कॅन करतात तेव्हा हा सेव झालेला डेटा डिजिटल लैंग्वेज मध्ये रुपांतरीत होतो. याचाच फायदा उठवून सायबर क्राईम करणारे व्यक्ती आपले बँक खाते रिकामे करतात. यालाच QR फिशिंग असे म्हणतात.
तुमची अशी फसवणूक तर झाली नाही ना? तर करू शकता अशा पद्धतीने चेक
1- तुमच्या नावावर किती लोन अकाउंट आहेत, हे तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोर द्वारे चेक करू शकता.
2- क्रेडिट स्कोर चेक करायचा असेल तर तुम्हाला क्रेडीट ब्युरो च्या एखादी सेवा घ्यावी लागते.
3-यासाठी तुम्ही ट्रान्स युनियन सिबिल, एक्सपिरीयन किंवा इक्विफॅक्स यासारख्या ब्युरोची सर्विस घेऊ शकतात.
4- एसबीआय कार्ड, पेटीएम आणि बँक बाजार यासारख्या साईट सुद्धा ब्युरो सोबत भागीदारी करून रिपोर्ट चेक करण्याची सुविधा देतात.
5-तुमची जन्मतारीख,मोबाईल नंबर,ई-मेल आयडी,पॅन कार्ड नंबरसारखे माहिती देऊन तुम्ही तुमच्या अकाउंट बनवू शकतात व आपल्या क्रेडिट स्कोर तपासू शकतात.
6- यामध्ये लॉगिन करून तुम्ही ॲक्सेस करू शकता की तुमच्या नावावर किती लोन अकाऊंट चालू आहेत.
7- जर तुमच्या नावावर एखादी लोन अकाऊंट चालू आहे आणि त्याची माहिती तुम्हाला नाही तर तुम्ही याबाबतची तक्रार इन्कम टॅक्स च्या वेबसाईटवर बोलू शकता.
नक्की वाचा:शेतकऱ्याच्या अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा! पीक संरक्षणासाठी बनवले अनोखे जुगाड..
ही चूक नका करू
1-पासवर्ड ठेवताना तो असा ठेवा की त्याचा सहजासहजी अंदाज बांधता येणार नाही.
2- कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर तुमचे व्यक्तिगत माहिती शेअर करू नका.
3- तुमच्या बँक खात्यात संबंधी आणि तुमच्याव्यक्तिगत माहिती कुठेही शेअर करू नका.
4-तुमच्या बँक खात्या विषयी रिलेटेड माहिती जसे की तुमचे एटीएम पिन, तुमचा यु पी आय पिन अशा ठिकाणी स्टोअर नका करू की ज्या ठिकाणाहून दुसऱ्यांना सहज त्या ॲक्सेस करता येईल.
5- कधीही माहिती नसलेल्या लिंक वर क्लिक करू नकाकिंवा एखादे गरज नसलेल्या किंवा माहीत नसलेल्या ॲप डाऊनलोड करणे पासून वाचा.
6- कधीही ऑफिसियल वेबसाइट चा वापर करावा.
7-मेसेज,फोन कॉल किंवा ई-मेलच्या माध्यमातून केवायसी व्हेरिफिकेशन अपडेट नका करू.
Share your comments