पोस्ट ऑफिसच्या (post office) अशा अनेक योजना आहेत. ज्यामध्ये शेतकरी तसेच सर्वसामान्य लोक चांगला नफा मिळवू शकतात. आज आपण चांगला परतावा देणाऱ्या या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुम्हाला चांगला हमी परतावाही मिळेल. आपण आज लहान बचत योजनेविषयी बोलत आहोत. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत तुम्हाला फक्त एकदाच पैशांची गुंतवणूक करावी लागेल. महत्वाचे म्हणजे या खात्याचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे.
लहान बचत योजनेत तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. 5 वर्षानंतर नवीन व्याजदरानुसार ती आणखी वाढवता येईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला बँक एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो. मासिक उत्पन्न योजनेमध्ये (POMIS) वार्षिक व्याज दर 6.7 टक्के आहे.
यवतमाळच्या शेतकऱ्याने तयार केली भन्नाट कार; फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर
महिना 2500 रुपये मिळतील
तुम्ही या योजनेत 4,50,000 लाख रुपये जमा केले तर एका वर्षासाठी एकूण 30 हजार 916 रुपये वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज मिळेल, तर मासिक व्याज रुपये 2 हजार 576 असेल. यानुसार तुम्हाला 61 हजार 832 रुपये वार्षिक व्याज मिळेल. जर ही रक्कम 12 महिन्यांत विभागली तर प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 5 हजार 152 रुपये होईल.
मेष, मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस जाणार उत्तम; इतर राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या
अटी आणि शर्ती
1) मासिक उत्पन्न (month production) योजनेत खाते उघडण्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.
2) यासाठी तुमच्याकडे ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी असणे आवश्यक आहे.
3) यासाठी तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतील.
4) सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध असेल.
5) हे कागदपत्र घेऊन, तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरू शकता.
6) तुम्ही ते ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता.
7) फॉर्म भरा आणि त्यात नॉमिनीचे नाव द्या.
8) हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करा.
महत्वाच्या बातम्या
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना फटका; गहू, पीठ, तांदूळ दरात मोठी वाढ
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक! गॅस सिलिंडरची किंमत 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
शेतकऱ्यांनो रद्दीच्या वापराने बियांची करा उगवण; जाणून घ्या 'या' नवीन तंत्रज्ञानाविषयी
Share your comments