पॅनकार्ड भारतात एक महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पॅन कार्ड वित्तीय कामात सर्वोच्च कागदपत्र आहे. बँकिंग क्षेत्रात पॅन कार्ड शिवाय कुठलेच काम पूर्वतवाला जात नाही. पॅन कार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी, डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी, टॅक्स भरण्यासाठी, शिवाय पॅन कार्ड आयकार्ड म्हणुन देखील अनेक सरकारी कामात वापरले जाते. पॅन नंबर म्हणजेच पर्मनंट अकाउंट नंबर हा दहा आकडी असतो जे की अल्फानुमेरिक संख्याचे मिळून बनलेली असते.
पॅन कार्ड हे भारतीय इनकम टॅक्स द्वारे लोकांना प्राप्त होते, भारतीय इनकम टॅक्स हे पॅन कार्ड लॅमिनिटेड टॅम्पर प्रूफ कार्डच्या रूपात लोकांना देते. हे एखाद्या व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी पॅन कार्ड हे युनिक असते म्हणजे एका व्यक्तीसाठी एकच पॅन नंबर हा असतो. पॅन कार्डला संपूर्ण भारतात मान्यता असते, याचा वापर संपूर्ण भारतात सरकारी तसेच निमसरकारी व बँकेत केला जातो. आज आपण जाणुन घेणार आहोत की, पॅनकार्डच्या नंबर मध्ये कोणकोणती माहिती हि दिलेली असते. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया याविषयी
पॅनकार्ड नंबर मध्ये काय माहिती लपलेली असते?
»पॅन कार्ड नंबर हा दहा अंकी असतो, याची पहिली तीन अक्षरे इंग्रजी अल्फाबेट असतात, हे अल्फाबेट भारतीय इनकम टॅक्स ठरवीत असते.
»यानंतर, चौथ्या अक्षरात करदात्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असते
»आणि पाचव्या अक्षरात पॅन कार्ड धारक व्यक्तीचे आडनाव किंवा जात याविषयींची माहिती समजते.
»पॅनकार्डच्या या पाच इंग्रजी अक्षरांनंतर 4 क्रमांक लिहिलेले असतात, हे क्रमांक सध्या आयकर विभागात कोणती मालिका सुरू आहे यावरुन हे क्रमांक ठरवले जातात.
»शेवटी, एक इंग्रजी अल्फाबेटचे कोणतेही एक अक्षर असू शकते.
पॅन कार्ड च्या अक्षरांचा अर्थ जाणुन घ्या…
»पॅनकार्ड मध्ये “P” एका व्यक्तीसाठी वापरला जातो.
»पॅन कार्ड मध्ये “C” हा कंपनीसाठी वापरला जातो.
»पॅन कार्ड मध्ये हिंदू अविभक्त कुटुंबासाठी “H” वापरला जातो
»पॅन कार्ड मध्ये “A” लोकांच्या गटासाठी वापरला जातो.
»पॅन कार्ड मध्ये “B” म्हणजे बॉडी ऑफ पर्सनस(BOI) असे असते.
»पॅन कार्ड मध्ये “G” म्हणजे सरकारी एजन्सी.
»पॅन कार्ड मध्ये "J" हे कृत्रिम न्यायिक व्यक्तीसाठी वापरले जाते
»पॅन कार्ड मध्ये "L" हे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वापरले जाते.
»तर पॅन कार्ड मध्ये "F" फर्म/लिमिटेड इत्यादींसाठी वापरला जातो.
Share your comments