भारतात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. उद्यापासून गणपती सर्वांच्या घरोघरी विराजमान झालेले पाहायला मिळतील. बाप्पाच्या स्वागताच्या (bappa) तयारीला कोणतीच कमतरता भासायला नको म्हणून लोकांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच तयारी सुरू केली आहे.
यावर्षी भाद्रपद गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सव 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. आज आपण बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
गणपती स्थापना मुहूर्त
बुधवार ३१ ऑगस्ट गणपती स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त
सकाळी ०६ वाजून २५ मिनिटे ते ०७ वाजून ५९ मिनिटापर्यंत
सकाळी ०७ वाजून ५९ मिनिटे ते ०९ वाजून ३३ मिनिटापर्यंत
सकाळी ११ वाजून ०७ मिनिटे ते १२ वाजून ४१ मिनिटे
पहिले दोघं शुभ मुहूर्त चौघडिया गणपती स्थापनेसाठी उत्तम आहे. जर या मुहूर्तावर स्थापना (Established Muhurta) होऊ शकली नाही तर शुभ चौघडिया ११ वाजून ०७ मिनिटे ते १२ वाजून ४१ मिनिटे या मुहूर्तावर हे शुभ काम तुम्ही संपन्न करू शकतात. परंतू यात १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटे या काळात राहूकाळ राहील त्यामुळे स्थापन करणे टाळले तर बर होईल.
लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी वापरा 'हे' तंत्र
गणपती बाप्पाचा घरात प्रवेश असा करा
श्री गणेशाचा आनंदाने घरात प्रवेश करा. गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजा सजवा आणि ते जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्या. गणपती आणण्यासाठी जाण्यापूर्वी नवीन वस्त्र धारण करा, डोक्यावर टोपी घाला.
सोबत लाकडी पाट देखील घेऊन जाणे आवश्यक. गणेशाची मूर्ती (Idol Ganesha) विराजित करुन घरात प्रवेश करा. सोबत घंटा किंवा इतर वाद्य यंत्र घेऊन जावे. बाजारात गणपती घेताना मोलभाव करु नये.
त्यांना आमंत्रित करुन दक्षिणा द्यावी. नंतर गणपतीची मूर्ती वाजत-गाजत आणा आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर आरती ओवाळा. मंगल गीत तसंच मंत्रांचे उच्चारण करा.
सरल पेन्शन योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन
गणेश स्थापन विधी
गणपतीची मूर्ती (Statue Lord Ganesha) स्थापित करण्यापूर्वी ईशान कोपरा स्वच्छ करुन कुंकुाने स्वस्तिक तयार करा आणि हळदीने चार ठिपके काढावे. नंतर अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. त्यावर लाल, पिवळा, किंवा केशरी रंगाचं आसान घाला. त्याला चारी बाजूने फुलं आणि आंब्याच्या पानांनी सजवावं आणि पाटासमोर रांगोळी काढा.
तांब्याच्या कळशात पाणी भरुन त्यावर नारळ ठेवा. जवळपास सुवासिक उदबत्ती, आरतीची थाळ, आरती पुस्तक, प्रसाद सर्व वस्तूं ठेवून घ्या. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन ॐ गंगणपते नम: चा उच्चारण करत मूर्तीला पाटावर विराजित करा. आता विधीपूर्वक पूजा करुन आरती करावी आणि प्रसाद वितरित करावा.
महत्वाच्या बातम्या
आजपासून ते ३ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे राशीभविष्य; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर
Cauliflower consumption: सावधान! प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबीचे सेवन केल्याने होतात गंभीर समस्या
Share your comments