आता शेतीच्या कामांना गती आली असून एप्रिल ते जून दरम्यान गहू आणि डाळीच्या कापणी, काढणीची कामे होत असतात. याच दरम्यान जूनमध्ये शेतकरी खरीप हंगामातील भात, डाळी, आदी पिकांची पेरणीसाठी तयारी करत असतो. खरीप हंगामातील उत्पन्नातून ६० टक्के देशाला अन्न पुरवठा होत असतो. तर खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते. परंतु सध्याची परिस्थीती ही शेतकऱ्यासाठी मारक आहे.
कोविड -१९ ची स्थितीही शेती व्यवसायावर परिणामकारक ठरत आहे. दरम्यान शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा इतर अडचणी येऊ नयेत यासाठी सरकार विविध योजनातून मदत करत आहे. अशाच एका योजनेविषयी हा आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ही योजना आहे, कोविड-१९ महाबँक किसान राहत योजना. ही योजना बँक ऑफ महाराष्ट्रच्या मार्फत राबवली जात आहे. सध्याच्या कोविड- १९ च्या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. कोविड-१९ च्या संकटातील शेतीच्या आणि घरगुती तात्परत्या समस्या सोडवणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे. कोविड-१९ महाबँक किसान राहत योजनेची मुदत ३० जून २०२० आहे. सहा महिन्यापर्यंत तुम्ही कर्ज या योजनेतून घेऊ शकता.
Eligibility of COVID-19 Mahabank Kisan Rahat Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता -
वैयक्तिक शेतकरी किंवा किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) मर्यादा असलेले संयुक्त कर्जदार, ज्यांचे बँक ऑफ महाराष्ट्रकडे टर्म लोन सुविधा आणि समाधानकारक ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान या योजनेतून कर्ज घेणारे शेतकरी एकाच वेळी मंजूर झालेली रक्कम घेऊ शकतील.
या कर्जाची मर्यादा - किमान १० हजार रुपये
जास्तीत जास्त - एक लाख रुपये
(केसीसी मर्यादेच्या 50 टक्के किंवा टर्म कर्जाच्या मर्यादेपर्यंत )
Moratorium period कालावधी - सहा महिने
परतफेडीचा कालावधी
दोन वर्ष (अधिस्थगन वगळता) सहामाही किंवा वार्षिक हप्त्यांमध्ये पीक कापणीच्या वेळी याचे हप्ते द्यावे लागतील.
सुधारित केसीसी मर्यादेच्या आधारे त्यानंतरच्या वर्षात नवीन किंवा वर्धित मर्यादा मागितली गेली तर कर्जाचे पूर्ण विवरण करावे लागेल.
हमी - विद्यमान वैयक्तिक हमी, प्रस्तावित सुविधेसाठी वाढविली असल्यास
व्याजदर
१० लाखा पर्यंतच्या कर्जासाठी १ वर्षासाठी एमसीएलआर प्लस बीएसएस @ ०.५० टक्के + १.७५ टक्के
१० लाखाच्या वरील कर्जासाठी - एक वर्षासाठी एमसीएलआर प्लस बीएसएस @०.५० टक्के + २.७५ टक्के आहे. दरम्यान या कर्जासाठी कोणतेच अनुदान नाही आहे.
कोणताही दंडात्मक व्याज नाही, मार्जिन शुन्य, प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कही आकारले जाणार नाही. दरम्यान आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण https://www.bankofmaharashtra.in/mahabankcares_covid-19 या संकेतस्थळावर जाऊन घेऊ शकता.
Share your comments