आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. मात्र सुरक्षित गुंतवणूक राहू शकणाऱ्या आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसते. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेऊया.
ही भारतीय पोस्ट पेमेंट बँकेची अपघाती विमा पॉलिसी (vima policy) आहे. ही समूह अपघाती योजना टाटा एआयजीच्या सहकार्याने चालवली जात आहे. या योजनेत, तुम्ही दरवर्षी 299 रुपये किंवा 399 रुपये प्रीमियम भरून 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळवू शकता.
हाडांना भरपूर कॅल्शियम देणारे हे पदार्थ दररोज खा; हाडं होतील मजबूत
अपघाती विमा पॉलिसी
पोस्ट ऑफिसच्या अपघाती विमा पॉलिसी (policy) अंतर्गत, अपघात झाल्यास विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. दुर्दैवाने तुमच्यासोबत अपघात झाला तर. या स्थितीत तुम्हाला IPD खर्चासाठी 60 हजार रुपये आणि ओपीडीसाठी 30 हजार रुपये दिले जातात.
तसेच विमाधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास. या परिस्थितीत अवलंबून असलेल्या व्यक्तींना 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. याशिवाय विमाधारकाच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख आणि वाहतूक खर्चही दिला जातो.
LIC च्या जीवन सरल योजनेत दरवर्षी मिळणार ५२ हजार रुपये; घ्या असा लाभ
जर विमाधारक अपघातात अक्षम झाला. या स्थितीत त्याला 10 लाख रुपये दिले जातात. पॉलिसी अंतर्गत अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. 299 रुपये प्रीमियम भरल्यानंतरही तुम्हाला त्याच सुविधा मिळतात, ज्या 399 रुपयांच्या प्रीमियमवर मिळतात.
मात्र 299 रुपयांचा अपघाती विमा काढून विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना शिक्षणासाठी मदत रकमेचा लाभ मिळत नाही.
महत्वाच्या बातम्या
कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगार
मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध; पालनाने शेतकरी होणार श्रीमंत
सावधान! सरकारला फसवून रेशन घेणाऱ्या लोकांवर होणार कारवाई
Published on: 18 September 2022, 02:39 IST