1. बातम्या

अरे व्वा! हे राज्य सरकार पशुपालकांकडून विकत घेईल गोबर गॅस,भर पडेल पशुपालकांच्या उत्पन्नात

नुकताच झारखंड राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प झारखंडचे अर्थमंत्री डॉ. रामेश्वर उरांवयांनी मांडला.यामध्ये त्यांनी छत्तीसगड राज्याच्या पशुधन विकासाच्या धर्तीवर झारखंड राज्यातील पशुपालकांचे आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी गोधन विकास योजना राबवण्याची घोषणा केली

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gobar gas plant

gobar gas plant

नुकताच झारखंड राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प झारखंडचे अर्थमंत्री डॉ. रामेश्वर उरांवयांनी मांडला.यामध्ये त्यांनी छत्तीसगड राज्याच्या पशुधन विकासाच्या धर्तीवर झारखंड राज्यातील पशुपालकांचे आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी गोधन विकास योजना राबवण्याची घोषणा केली

इतकेच नव्हे तर  झारखंड सरकार पशुपालक शेतकऱ्यांनी तयार केलेल्या गोबर गॅसची देखील खरेदी करणार आहे. या माध्यमातून पशुपालकांनी विकसित केलेला गोबरगॅस राज्य सरकारकडून विकत घेतला जाणार असल्याने पशुपालकांच्या उत्पन्नात भर पडण्यास त्याची मदत होणार आहे.तसेच झारखंड सरकारने घोषणा केलेल्या गोधन विकास योजनेमुळे चाळीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

एवढेच नाही तर सन 2022 -2023या आर्थिक  वर्षासाठी एका दिवसात 85 लाख लिटर दूध उत्पन्नाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पशुपालकांना आवश्यक त्या सोयीसुविधा व प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे कृषी पंपाच्या पहिल्या 100 युनिटचे  वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. 

तसेच जलस्रोतांचा विकास व्हावा यासाठी 1894 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात सरकारने केली आहे. त्यासोबत झारखंड पिक विमा योजने याच्या माध्यमातून 25 कोटी रुपयांचा कॉर्पस निधी उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली.

English Summary: zharkhand goverment purches gobar gas from farmer that annuonce in state budget Published on: 05 March 2022, 10:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters