1. बातम्या

कमाई नोकरदाराला भारी, तरी लग्नासाठी ‘सॉरी’, शेतकरी पुत्राचे कौतुकास्पद पाऊल

अहमदनगर- घरात आर्थिक सुबत्ता असूनही अनेक शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नोकरदारापेक्षा आर्थिक सक्षम असूनही केवळ शेती करतो म्हणून मुलाला नकार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात अविवाहित शेतकरी पुत्रांची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मात्र, नांदगाव तालुक्यातील शेतकरी पुत्राने पुढाकार घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. शिर्डी येथील अनाथालयातील मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
orphen girl marrige

orphen girl marrige

अहमदनगर-  घरात आर्थिक सुबत्ता असूनही अनेक शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नोकरदारापेक्षा आर्थिक सक्षम असूनही केवळ शेती करतो म्हणून मुलाला नकार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात अविवाहित शेतकरी पुत्रांची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मात्र, नांदगाव तालुक्यातील शेतकरी पुत्राने पुढाकार घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. शिर्डी येथील अनाथालयातील मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

योगेश आहेर असे शेतकरी पुत्राचे नाव असून त्याने अनाथलयाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या आर्थिक सक्षमतेची माहिती दिली. दोन्ही बाजूंच्या संमतीनंतर योगेश व महेश्वरी या दोघांचा विवाह मोठ्या दिमाखात संपन्न झाला. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमानं जपलेली नाती श्रेष्ठ असतात याची साक्ष या विवाहानिमित्ताने सर्वांना आली.

नोकरदाराला भारी, शेतकऱ्याची स्वारी:

योगेश यांच्या घरी बागायती शेती आहे. आठ एकर शेतीत विविध प्रयोग केले जातात

तसेच शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देखील देण्यात आली आहे. दिवसाकाठी शंभर लीटर दूध डेअरीला पाठविले जाते. शेती व दुग्धव्यवसाय यांच्याजोरावर योगेश यांचा आर्थिक गाडा सुस्थितीत चालतो. मात्र, केवळ नोकरी करणाराच मुलगा हवा म्हणून त्यांना आजवर लग्नासाठी नकार देण्यात आले होते.

रक्तच्या नात्याहून, मायेचं नात श्रेष्ठ:

शेतकरी पुत्र योगेशच्या विवाहाचा प्रस्ताव कन्या महेश्वरी हिच्यासमोर ठेवण्यात आला. त्यावेळी आयुष्यभर प्रेम व मायेची ऊब मिळण्याबद्दल आश्वत झाल्यानंतर महेश्वरी हिनं लग्नास तत्काळ होकार दिला आणि अनोखी लग्नगाठ जुळून आली. महेश्वरी ही शिर्डी येथील अनाथालयात दाखल झाली होती. तिच्या डोक्यावरील नात्यांचे छत्र हरपले होते. शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या महेश्वरीनं या विवाहातून समाजाला संदेश दिला आहे.

 

 शेतकरी नवरा नको गं बाई!

नोकरदारापेक्षा सधन असूनही शेतकरी पुत्रांना लग्नासाठी नकार दिला जातो. त्यामुळे तिशी उलटून गेल्यानंतरही विवाह निश्चित होत असल्याने शेतकरी तरुणांमध्ये नैराश्य आणि व्यसनाधीनता वाढताना दिसत आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत युवक शेती करतात आणि लग्नही जमत नसल्याने त्यांची मानसिक अवस्था अधिकच सैरभैर होते. त्यांचे मनोबलही खचते.

शेती व शेतकरी पुत्रांकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत जाणकरांनी व्यक्त केले आहे. 

English Summary: young farmer marry with orphan girl Published on: 18 September 2021, 09:35 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters