1. बातम्या

आपका बँक (आपली बँक) या अभियानाद्वारे घरी बसून मिळेल पीएम किसान योजनेचा हप्ता

सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबवत आहे. ज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6000 रुपये पाठवत असते. या योजनेशी संबंधित एक मोठी बातमी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Aapka Bank campaign

Aapka Bank campaign

सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबवत आहे. ज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6000 रुपये पाठवत असते. या योजनेशी संबंधित एक मोठी बातमी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्यात कोणतीच अडचणी येऊ नयेत यासाठी सरकार आपका बँक अभियान सुरू करत आहे. या अभियानातून शेतकरी घरी बसून पीएम किसानचा पैसा मिळवू शकणार आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते. साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते.

हेही वाचा : शेतकऱ्यांनो उसाची नोंदणी झाली नसेल तर काळजी करू नका, साखर आयुक्तालयाने घेतला मोठा निर्णय

या योजनेतील लाभार्थी वयस्कर आहेत तर काहीजण दिव्यांग आहेत. खेड्या-पाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ फायदा होत असतो. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरीच्या शेतीचा किंवा घरातील खर्चाला हातभार लागत असतो. या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचा पैसा मिळण्यात कोणतीच अडचण होऊ नये म्हणून सरकार एक नवीन अभियान सुरू करत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना किंवा आपण त्याला पीएम किसान योजना देखील म्हणत असतो. या योजनेचा पैसा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता एटीएम किंवा बँकेत जाण्याची गरज नसणार आहे. हे सर्व शक्य होणार आहे, सरकारच्या आपका बँक (आपली बँक) अभियानातून. ते कसं हे आपण या लेखातून जाणून घेऊ.

शेतकरी आपले आधारशी जोडलेले बँक खाते आधार सक्षम भुगतान प्रणाली (एईपीएस) च्या मदतीने घरी बसून पीएम किसानचा पैसा मिळवू शकतात. यासाठी पोस्ट विभागातील एक कर्मचारी तुमच्या घरी येईल आणि हॅण्डहेल्ड उपकरणाने फिगर प्रिंट घेईल आणि तुम्हाला पैसा देईल. दरम्यान ही योजना ४ जून पासून सुरू झाली असून १३ जूनपर्यंत चालू राहणार आाहे.

काय फायदा

  • पैसे घेण्यासाठी शेतकऱ्यांना एटीएम किंवा बँकेत जाण्याची गरज राहणार नाही.

  • जे शेतकरी खेड्यात राहतात, किंवा त्यांच्या गावात वाहतुकीचे साधन नाही अशा गावातील शेतकऱ्यांसाठी हे अभियान फायदेशीर आहे.

  • म्हातारी किवा वृद्ध किंवा दिव्यांग शेतकऱ्यांना या अभियानाचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना बँकेतील रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.

नोंदणी प्रक्रिया (Registration Process)

जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरच या योजनेत आपली नोंदणी करा. या योजनेत नोंदणी करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असेल.
त्यात नोंदणी करण्यासाठी, आपल्याला त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
https://www.pmkisan.gov.in/registrationform.aspx येथे जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.

खात्यात हप्ता कसा तपासायचा (How To Check Installment in Account)

  • पहिले पीएम किसान(PM Kisan) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.

  • यानंतर तुम्हाला त्यात फार्मर कॉर्नर (Farmers Corner) चा पर्याय दिसेल

  • जिथे तुम्हाला लाभार्थी स्थितीती मिळेल (Beneficiary Status) पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

  • यानंतर, या नवीन पेजवर, तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडून तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल.

  • हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्यांची सर्व माहिती मिळेल.

English Summary: you will get the installment of PM Kisan's scheme sitting at home by Aapka Bank campaign Published on: 08 June 2022, 09:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters