दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. त्यासाठी पेट्रोल आणि डिझेल ला पर्याय म्हणून इथेनॉल चे महत्व खूप आहे. याबाबतीत लोदगा येथील ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट चे उद्घाटन केंद्रीय पर्यटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
.तसेच या उद्घाटनानंतर लातूर येथील आयोजित सभेत नितीन गडकरींनी इथेनॉल चे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले आहे.
बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, किचन वाले शेतकऱ्यांसाठी फार फायद्याचे असून, विज्ञानाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मित आधारित शेती करणे आवश्यक आहे असं ते म्हणाले. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या ऐवजी आता इथेनॉलचा वापर ही येणाऱ्या काळाची नितांत गरज आहे असे त्यांनी सांगितले आहे.
इथेनॉलची निर्मिती ही प्रक्रिया कृत मक्या पासून बनते. तसेच अनावश्यक अशा गॅसोलीन पेक्षा इथेनॉल हे कमी हानिकारक आहे याचा अर्थ स्थानिक शेती आणि उत्पादन अर्थव्यवस्थांना मदत करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता बाजारपेठेत कच्च्या मालाची मागणी आहे त्याचे उत्पादन करणे आवश्यक आहे असं नितीन गडकरींनी म्हटले. तसेच सर्व प्रकारच्या बायोगॅस पासून इथेनॉल तयार करता येते.
आपण जर येथे नावाचा विचार केला तर हा एक कमी किमतीचा पर्यायी असे इंधन आहे. इथेनॉल मुळे प्रदूषण कमी होते आणि अधिक उत्पादकता मिळते.इथेनॉल, इलेक्ट्रिक कार, सीएनजी यासारख्या निर्मितीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा फक्त शेतकरी करू शकतात, असही बोलताना नितीन गडकरी म्हणाले. तुम्ही उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करायची जबाबदारी ही माझी असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.(संदर्भ-थोडक्यात)
Share your comments