1. बातम्या

किसान क्रेडिट कार्ड: एक पानाचा अर्ज अन् 3 लाखांपर्यंत मिळवा कर्ज

ललिता बर्गे
ललिता बर्गे
kcc

kcc

मुंबई- किसान क्रेडिट कार्ड(KISAN CREDIT CARD) द्वारे शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करण्यासाठी 1998 मध्ये सरकारद्वारे या योजनेचा आरंभ करण्यात आला.

पंतप्रधान किसान क्रेडिट कार्ड ही आता प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) सोबत जोडण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 4% व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्जाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना पीएम किसान लाभार्थी होणे अत्यंत सोपे आहे.

पीआयबीच्या माहितीनुसार, कोविड कालखंडात 2 कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले. त्यापैकी बहुतांश कार्ड छोट्या शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले.

हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड,एसबीआयकडे शेतकऱ्यांसाठी आहे ही ऑफर

कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुपालन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शेतकऱ्यांना या लोनचा फायदा प्राप्त होईल. याद्वारे कर्जाचा मिळणारा व्याजदर अन्य बँका सापेक्ष मिळणाऱ्या दरापेक्षा निश्चितच कमी आहे. हंगामाच्या कालावधीनुसार शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी केली जाते.

अर्ज कसा करावा?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी योजना) साठी अर्ज करू शकतात. एसबीआयने शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. एसबीआय शाखेला भेट देण्याद्वारे शेतकरी आपला अर्ज योजनेसाठी करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याच्या स्टेप्स:

पायरी 1: सर्वप्रथम तुम्हाला पुढील वेबसाईटवर लॉग-इन करावे लागेल: https://www.sbiyno.sbi/index.html

पायरी 2 : योनो कृषी (Yono Krishi) वर जा

पायरी 3 : अकाउंट (खाते) वर जा

पायरी4 : केसीसी रिव्ह्यू सेक्शनवर जा आणि अप्लाय करा

केवायसी (KYC) ची आवश्यकता नाही:

 

PM किसान योजना ही किसान क्रेडिट कार्ड (केसीसी योजना) सोबत लिंक केल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी केवळ एक पानाचा अर्ज भरण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना हा अर्ज पुढील वेबसाईटवर उपलब्ध असेल: pmkisan.gov.in

KCC साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ बाबी महत्वाच्या:

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय 18 ते 75 यादरम्यान असावे. 60 वर्षाहून अधिक वयाच्या अर्जदाराला अर्ज करतेवेळी सह-अर्जदाराची आवश्यकता असेल.

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters