आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्र आहे. कुठलीही शासकीय योजना असो म्हणजे कुठलेही शासकीय काम किंवा एखादे फॉर्म बनायचे वगैरे काम असेल तर तुम्हाला आधार कार्ड हे लागतेच लागते. बँकेच्या व्यवहारांमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे.
तसेच मोबाईल नंबर, पॅन कार्ड, पीएफ खाते इत्यादी खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. हेच आधार कार्ड तुम्हाला आत्ता काही मिनिटांमध्ये पर्सनल लोन देखील मिळवून देऊ शकते. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
आधार कार्ड च्या द्वारे कर्ज घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
जर तुम्हाला आधार कार्डद्वारे पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या कार्ड वरची माहिती बरोबर आहे का याची खात्री करावी लागते. जर कार्ड वरची माहिती योग्य असेल तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी पात्र ठरूशकता.
पर्सनल लोन साठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेची वेबसाइट किंवा त्या बँकेचे ॲप वर लॉगिन करा.
- लोगिन केल्यानंतर वेबसाईट वरील लोन ऑप्शन वर जा आणि वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करा
- जर तुम्ही संबंधित पर्सनल लोन साठी पात्र आहात की नाही ते येथे तपासा.
- जर तुम्ही पात्र असाल याची पुष्टी झाल्यानंतर टॅबवर क्लिक करा.
- तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाची विंडो उघडते. या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक, रोजगार आणि व्यवसायाची तपशीलवार माहिती भरा.
- या सगळ्या प्रोसेस नंतर बँकर तुमच्याकडून तपशिलांची पडताळणी करतो.यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची प्रत अपलोड करण्यास सांगितले जाते.
- बँकेने तुमच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लगेच कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- यामध्ये अटआहेकीहीसुविधामिळवण्यासाठीव्यक्तीचेकीकमीतकमीवय 23 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असावे.
Share your comments