1. बातम्या

मोबाईलने करा रेशन कार्डसाठी अर्ज ; काही मिनीटात पुर्ण होईल अर्जाची प्रक्रिया

रेशन कार्डच्या माध्यमातून गरिब जनतेला अन्नधान्य मिळत असते. राज्य सरकारकडून सार्वजनिक वितरण वाटपानुसार प्रत्येक नागरिकांना हे कार्ड दिले जाते. या कार्डच्या आधाराने गरिबाच्या घरात तांदूळ, गहू,डाळ येत असते. दरम्यान केंद्र सरकारने रेशन कार्डविषयी एक महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपुर्वी घेतला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

 

रेशन कार्डच्या माध्यमातून गरिब जनतेला अन्नधान्य मिळत असते. राज्य सरकारकडून सार्वजनिक वितरण वाटपानुसार प्रत्येक नागरिकांना हे कार्ड दिले जाते. या कार्डच्या आधाराने गरिबाच्या घरात तांदूळ, गहू,डाळ येत असते. दरम्यान केंद्र सरकारने रेशन कार्डविषयी एक महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपुर्वी घेतला आहे. एक रेशन कार्डवर आपण आता कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य घेऊ शकतो. दरम्यान रेशन कार्ड घेण्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयाचा चक्करा मारावा लागतात. आता रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपण ऑनलाईनही अर्ज करु शकतो. यामुळे आपल्या कार्यालयापर्यंत पाय पीट करण्याची गरज राहणार नाही.

ऑनलाईनने आपण अर्ज करू शकत असल्याने मोबाईल द्वारेही आपण रेशन कार्ड मिळवू शकतो. मोबाईल द्वारे रेशन कार्डचा अर्ज कसा करायचा याची माहिती घेऊया.  मोबाईलवरून रेशन कार्डसाठी अर्ज करताना आपल्याला आधी अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर वर जा आणि आपल्या तपशीलांसह नोंदणी करून साईन इन करा.
खाली स्क्रोल करा आणि 'सेवा' स्तंभातील "अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग " वर क्लिक करा. तिथे " नवीन शिधापत्रिका मागणी "वर क्लिक करा . आवश्यक कागदपत्रांची पीडीएफ (PDF) फाईल अपलोड करा, आणि "अर्ज करा" वर क्लिक करा. आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा . रेशन कार्डची ई-कूपन डाऊनलोड करुन प्रिंट करा.

रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

  • पॅनकार्ड
  • पासपोर्ट
  • मतदान कार्ड
  • आधारकार्ड
  • वाहनचालक परवाना
  • शासकीय ओळखपत्र
    रहिवाशी पुराव्यासाठी
  • पासपोर्ट
  • विज बिल
  • वाहनचालक परवाना
  • भांडोत्री असल्यास  करारनामा
  • सात बारा उतारा
  • मालमत्ता आयकर पावती
  • टेलीफोन बिल, पाणी पट्टी पावती

कोण करु शकतो रेशनकार्डसाठी अर्ज
कोणतीही व्यक्ती कार्डसाठी अर्ज करु शकते. पण तो भारताचा नागरिक असावा. कायद्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पालकांच्या रेशन कार्डमध्ये सामविष्ट करण्यात आले आहे.   गरीबी रेषा - बीपीएल, च्या खाली रेशनकार्ड आणि बिगर बीपीएल रेशन कार्ड.
बीपीएल रेशन कार्ड प्रकारात खाद्य, इंधन, आणि इतर वस्तूंच्या विविध अनुदानाच्या हक्कानुसारप निळे, पिवळे, हिरवे, लाल रेशन कार्ड अशा विविध रंगाने विभक्त केले आहे. व्हाईट पांढरे रेशन कार्ड गरिबी रेषेच्या वरच्या लोकांसाठी आहेत.

English Summary: you can get get ration card on mobile , apply for ration card online Published on: 05 June 2020, 02:27 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters