1. बातम्या

खुशखबर: आता एकाच मोबाईलद्वारे करता येणार 50 शेतकऱ्यांची इ पीक पाहणी, ई पीक पाहणीला येणार वेग

नासिक: ई पीक पाहणी हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पिकपहाणी ही स्वतःच्या मोबाईल द्वारे स्वतः करता येणारआहे. अगोदर एका मोबाईल द्वारे फक्त वीस शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात येत होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
e pik pahaani

e pik pahaani

नासिक: ई पीक पाहणी हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पिकपहाणी ही स्वतःच्या मोबाईल द्वारे स्वतः करता येणारआहे. अगोदर एका मोबाईल द्वारे फक्त वीस शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात येत होती.

परंतु आता शासनाने यामध्ये वाढ करत एकाच मोबाईल वरून कमीत कमी 50 शेतकऱ्यांच्या पिकांचे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 यासाठी आता स्वयंसेवकांचे मदत घेतली जाणार असून अशा स्वयंसेवकांची यादीचअप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याकडून मागवली असल्याने आता रब्बी हंगामाची इ पीक पाहणी वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगोदर पिक पाहणी मध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार, तलाठ्यांची मनमानी आणि चुकीची आकडेवारी यामुळे शासकीय यंत्रणा कायमच टीकेचे धनी होत होती. यावर पर्याय म्हणून शासनाने ईपीक पाहणी ची नोंदणीप्रकल्प सुरू केला.

यामध्ये शेतकरी स्वतः आपल्या पिकांचीमोबाईल द्वारे एक पाहणी नोंदवू शकतात. व शेतकऱ्यांनी नोंदवलेली पीक पाहणी ला तलाठी आणि मंडळ अधिकारीत्यांच्याकडून मान्यता दिली जाते.खरीप हंगामात यशस्वी ठरलेलीई पीक पाहणी आता रब्बीमध्ये ही केली जाणार आहे.यासाठी स्वतः अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे स्वयंसेवकांना फोन करूनत्यांचे कामकाज याबाबतची माहिती विचारून खात्री करणार आहेत.

जेणेकरून अत्यंत पारदर्शकपणे होईल.

आता एकच मोबाईल द्वारे 50 शेतकऱ्यांचे पीक पाहणी करता येण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेस्वयंसेवकांची संख्या कमी होईल. गावनिहाय निवडण्यात येणार्‍या स्वयंसेवकांची यादी आता अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मागवली आहे.(संदर्भ-दिव्य मराठी)

English Summary: you can get 50 farmer e pik pahaani by one mobile in nashik district Published on: 25 November 2021, 06:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters