कालच उत्पन्न वाढीबाबत वाह! वाह! मिळवलेल्या पुणे बाजार समितीची आज थू.. थू... झालेली ऐकायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १४ कोटीने उत्पन्न वाढवून पुणे बाजर समितीने कालच आपली पाठ थोपटून घेतली. मात्र दुसऱ्याच दिवशी लाच घेताना कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्यावर गुन्हा दाखल होऊन बाजार समितीला बदनामीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पुणे बाजार समिती एकाच दिवसाच्या फरकाने सुप्रसीद्धीहुन कुप्रसिद्ध झाली आहे.
बाजार आवारातील कामांचे बिल मंजुरीसाठी बांधकाम व्यावसायिकाकडे दोन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे यांच्यासह उपअभियंता अरविंद दामोदर फडतरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार बांधकाम व्यवसायिकाने बाजार समितीची स्वछतागृह आणि उद्योग भवन छताचे काम केले होते. या कामांची बिले मंजूर करण्यासाठी बिलाच्या रक्कमेतून १५ टक्के रक्कम लाच म्हणून मागण्यात आली होती. त्यामुळे याबाबत त्या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पडताळणी केली असता कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे यांच्यासह उपअभियंता अरविंद दामोदर फडतरे यांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करताना आढळून आले.
त्यामुळे या दोघांवर पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी ही कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपअधीक्षक सीमा आडनाईक करीत आहे. या घटनेमुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. या घटनेमुळे मात्र बाजारसमितीची बदनामी होत आहे. पुणे बाजार समिती एक चांगली बाजार समिती म्हणून राज्यात ओळखली जाते. मात्र आता या प्रकरणामुळे याची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
बारामतीच्या पिवळ्या कलिंगडांची जयंत पाटलांना भुरळ, म्हणाले बारामतीकरांकडे..
आता शेतातील पाचट जाळली तर होणार गुन्हा दाखल, 15 हजारांचा दंडही होणार
आता जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोबाइल अँपची निर्मिती, आता घरबसल्या करा व्यवहार
Share your comments