1. बातम्या

2018-19 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत, येणाऱ्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने, 2018-19 या वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीसाठीच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज जारी केला आहे. 2017-18 या वर्षातल्या रब्बी हंगामातल्या कृषी उत्पादनाची कृषी मंत्रालयाने दिलेली आकडेवारी, मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावरच्या सूचीबद्ध कंपन्यांचे वित्तीय निकाल, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, महालेखापालाने दिलेली केंद्र सरकारी खर्चाची मासिक आकडेवारी, महालेखापाल आणि नियंत्रकांनी दिलेली राज्य सरकारांच्या खर्चाची 2018-19 या वर्षातल्या एप्रिल ते जून या काळातली आकडेवारी यावर आधारित हा अंदाज प्रसारित करण्यात आला आहे.

2018-19 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी, वन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या उत्पादनाच्या मूळ किंमतीच्या सकल मूल्य वर्धनात 5.3 टक्के वाढ नोंदवली आहे. 2017-18 च्या पहिल्या तिमाहीत ही वाढ 3 टक्के एवढी होती. खाण उद्योगात 2018-19 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मूळ किंमतीच्या तिमाही सकल मूल्यवर्धनात 0.1 टक्का वाढ झाली. 2017-18 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही वाढ 1.7 टक्के होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात 13.5 टक्के वाढ नोंदवली गेली. या आधिच्या वित्तीय वर्षात ही वाढ उणे 1.8 टक्के होती. वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्त सेवा क्षेत्रात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 7.3 टक्के वाढ नोंदवली गेली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रात 8.7 टक्के वाढ नोंदवली गेली तर याच काळात व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणसंबंधी सेवांमध्ये 6.7 दशांश टक्के वाढ झाली. वित्तीय स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत साडे सहा टक्के वाढ झाली. 

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters