
मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक घेऊन सूचना दिल्या होता.
नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे.
ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
Share your comments