1. बातम्या

जागतिक व्यापार संघटना : विकसनशील देश मंत्रीस्तरीय बैठक

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
जागतिक व्यापार संघटनेची विकसनशील देशांची मंत्रीस्तरीय बैठक नवी दिल्लीत समाप्त झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाने या बैठकीला प्रारंभ झाला होता. जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रॉबर्टो ॲबेजोडो या वेळी उपस्थित होते.

व्यापार तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसताना आणि स्वदेशी उद्योगांना संरक्षण देण्याची गरज वाढत असताना एकत्रित चर्चा करणे आणि बहुआयामी आराखडा तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. दिल्ली बैठक म्हणजे विकसनशील देशातील समान मुद्यांवर खुली आणि स्पष्ट चर्चा करणे यासाठी भारताने उचलेले पाऊल आहे, असे प्रभू यांनी या भोजनप्रसंगी स्पष्ट केले. जागतिक व्यापार संघटनेने दिलेल्य सूचनांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर या वेळी एकत्रित चर्चा करण्यात येईल. जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रॉबर्टो ॲबेजोडो यांनीही यावेळी आपली मते मांडली.

मंत्रीस्तरीय बैठकीच्या आज झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी भाषण करताना सुरेश प्रभू म्हणाले की, विकसनशील देशांमध्ये 7.3 अब्ज लोक राहत असून, त्यांना विकासाच्या फायद्यांपासून वंचित ठेवता येणार नाही. देशांचा विकास व्यापाराद्वारे करणे हे जागतिक व्यापार संघटनेचे उदिृष्ट असल्याचे प्रभू यांनी सांगितले. बहुआयामी व्यापार प्रणाली ही सर्वसंबंधित देशांची एकत्रित जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. सदस्य देशांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा नवी दिल्लीत मंत्रिस्तरीय बैठकीचा उद्देश असून जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणांबाबत विकसनशील देशांचा एकत्रित दृष्टीकोन सादर करणे हा देखील या परिषदेतील महत्वाचा मुद्दा होता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters