सध्या पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. विविध मार्गाने पर्यावरणाची हानी होत आहे, यातील सर्वात मोठा घटक म्हणजे प्लास्टीक. प्लास्टीकमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. समुद्रात लाखो टन प्लास्टिकचा कचरा दररोज जमा होत आहे. यासाठी आपण सर्वजण जबाबदार आहोत..
यावर आपले सामाजिक कर्तव्य समजून यावर आळा लागणार आहे. अशीच आपले सामाजिक कर्तव्य लक्षात घेऊन तामिळनाडूच्या एका युवकांने असाच पर्यावरणाला वाचणारा उपक्रम केला आहे.तामिळनाडूच्या विरुधूनगरच्या एका गावात राहणाऱ्या २१ वर्षाचा टेनिथ आदित्यने केळीच्या पानावर एक लीफ टेक्नोलॉजी तयार केली आहे. याच्या सहाय्याने केळीचे पान झाडावरून तुटल्यानंतरही हिरवेगार राहते.असा शोध लावणाऱ्या अदित्यने कॉम्प्युटर सायन्समधून पदवी केली आहे, त्यानंतर आदित्य युवकांच्या समस्या सोडवण्यामध्ये विश्वास ठेवतो.
आदित्यने आतापर्यंत १९ इनोव्हेशन केले आहेत आणि त्याच्या नावावर आतापर्यंत १७ अंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय आणि १० राज्यस्तरीय सन्मान आहेत. आदित्यची ओळख एक प्रोफेशनल कॉइन कलेक्टर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, शिक्षक आणि मोटिवेशनल स्पीकर अशी आहे.आदित्य प्रत्येक दिवशी काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. आता उद्देश आहे की त्याचे स्वतःचे ज्ञान आणि प्रतिमेचा उपयोग देशाच्या हितासाठी करणे हा आहे.आदित्यने वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावण्याची सुरुवात वयाच्या आठव्या वर्षापासून केली. आदित्य सांगतो की त्याला लहानपणात त्याच्यासाठी घेतलेले खेळणे खोलून पाहण्याचा आणि इतर खेळांमध्ये वापरलेली तंत्रज्ञान समजण्याची जिज्ञासा होती. हीच जिज्ञासा त्याला विज्ञानामध्ये आवड निर्माण करण्यात महत्वाचे ठरले. आदित्यने विज्ञानाचे दुसरे क्षेत्र असलेल्या ऊर्जा, बायोलॉजी इत्यादीवर लक्ष केंद्रित केले.
आदित्यला स्वतःचा एक्सपेरिमेंटसाठी जे साहित्य लागायचे ते तो स्वतः बनवायचा. हे सांगताना आदित्य सांगतो की, काम करताना त्याला विविध प्रकारच्या डिवाइस चालविण्यासाठी वेगळ्या प्रकारचा प्लग पॉईंटची गरज भासायची. त्यासाठी बरेच एक्सटेंशन बोर्ड वापरावे लागायचे. त्यासाठी भरपूर प्रमाणात वायर लागायचे त्या वायरसला हॅन्डल करायला मुश्कील व्हायचे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या गरजेसाठी ऍडजेस्ट टेबल एक्सटेंशन बोर्ड बनवले. त्यानंतर त्याने बायलॉजी विषय अभ्यासाला घेतला. त्यावर बोलताना आदित्य म्हणतो की, जेव्हा त्याने बायोलॉजीवर फोकस केला तेव्हा त्याला कळले की प्रत्येक ऑर्गानिक मॅटर एक डी कंपोस्ट असते म्हणजे ऑरगॅनिक मॅटर ची कोशिका असते आणि तिचे वय वाढत राहते.
या कॉन्सेप्टच्या आधारे आदित्यने सेल टेक्नॉलॉजीवर काम केले ज्यामुळे आपण सेलच्या वाढत्या वयाला थांबवू शकतो. त्यानंतर त्याने आपल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केळीच्या पानावर करून एक एक लीफ टेक्नॉलॉजी तयार केली. या टेक्नॉलॉजीमुळे केळीच्या पानाचा आयुष्य वाढले. झाडावरून तुटल्यानंत कमीत-कमी तीन दिवसांमध्ये पान वाळते. परंतु जर त्या पानाला आदित्यच्या टेक्नॉलॉजीने प्रीझर्व केले तर त्या पानाचे आयुष्य तीन वर्षापर्यंत वाढते. म्हणजे ते पान ३ वर्षापर्यंत व्यवस्थित राहू शकत. त्यांच्या पानांपासून कप,कटोरी इत्यादी प्रोडक्ट बनवल्यानंतर त्याचा उपयोग केमिकल फ्री आणि इको फ्रेंडली बायो मटेरियलच्या रूपामध्ये करता येऊ शकतो. या उत्पादनांच्या वापरानंतर आपण त्यांना जैविक पद्धतीने डी कंपोज करू शकतो त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा प्रदूषण होत नाही.
ह्या टेक्नॉलॉजीमुळे पानामध्ये असलेले इतर गुण जसे लवचिकता, सहनशीलता इत्यादी गुणांना वाढवू शकतो. या टेक्नॉलॉजीने प्रीझर्व केलेली पाने कोणतेही तापमान सहन करू शकतात तसेच जास्तीचे वजन सहन करण्याची क्षमता वाढते. आदित्यचा हा शोध सिंगल युज प्लास्टिक आणि पेपर साठी चांगला पर्याय आहे.
प्रीझर्व केलेल्या केळीच्या पानांपासून रोज वापरातल्या तीस प्रकारच्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात. ज्यामध्ये प्लेट, ग्लास, कटोरी,टंब्लर, पॅकिंग बॉक्स इत्यादींचा समावेश होतो. ह्या टेक्नॉलॉजीमुळे केळीच्या पानापासून नाही तर इतर वृक्षांच्या पानांचा उपयोग सुद्धा केला जाऊ शकतो.
Share your comments