भारताची ओळख ही जगामध्ये एक जैवविविधता असलेला देश म्हणून आहे. जवळ जवळ भारतामध्ये 65 टक्के लोक के औषधीय वनस्पतींच्या लागवडीखालील शेती करण्यामध्ये गुंतले आहे. हरबल वनस्पतींच्या विविध प्रकारच्या जाती या भारतामध्ये उपलब्ध आहेत. या वनस्पतींवर देखील जलवायु परिवर्तनाचा परिणाम होतो.
त्यामुळे बहुतेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. जर वेळेतयोग्य पावले उचलली तर आपण त्यांना वाचवू शकतो. औषधी वनस्पतींच्या शेतीमधून शेतकरी केवळ औषधांची उपलब्धता वाढवू शकतील असे नाही तर स्वतःसाठी एक चांगले उत्पादनाचे साधन निर्माण करू शकतात.
भारतामध्ये बऱ्याच प्रकारचे औषधी वनस्पती प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये अश्वगंधा, भूंगराज, शतावरी, पुदिना, मोगरा, तुलसी, ब्राम्ही इत्यादींचा उल्लेख करता येईल. बदलत्या काळामध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व सगळ्यांनाच पटलेले आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या शेती मध्ये एक चांगली संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हर्बलवनस्पतींच्या शेतीकडे वळले आहेत.
हरबल शेतीला चालना देण्यासाठीसरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. राष्ट्रीय औषध बोर्ड कडून संपूर्ण देशात औषधी वनस्पतींचा विकास, नियोजन आणि संरक्षण यासाठी संपूर्ण देशात काम करीत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे. हे बोर्ड शेतकऱ्यांना जे प्राथमिक स्वरूपाचे औषधी वनस्पतींची शेती करणे, औषधी वनस्पतींची रोपांचा पुरवठा यासाठी नर्सरी ची स्थापना करणे, बाजारपेठेची निर्मिती इत्यादी साठी शेतकऱ्यांना मदत करीत आहे.औषधी वनस्पतींची शेती ला उत्तेजन देणे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 140 औषधी वनस्पतींच्या जातींची यादी तयार करण्यात आले आहे. तसेच यामध्ये उत्पादन खर्चाच्या 75 टक्के अनुदान मिळते,
तसेच आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून दिलेल्या आर्थिक पॅकेज च्या माध्यमातून येणाऱ्या दोन वर्षात चार हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या सहाय्याने दहा लाख हेक्टर जमिनीला औषधी वनस्पतींच्या लागवडीखालील क्षेत्रात आणण्याचा मानस आहे. यामधून शेतकऱ्यांना जवळ जवळ पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक उत्पन्न मिळेल. सध्या कृषी क्षेत्राचा विस्तार होत आहे.
शेतकरी सध्या त्यांना च्या माध्यमातून जास्त उत्पन्न मिळेल त्याची कास धरताना दिसत आहे. भारतासारख्या विशाल देशांमध्येहर्बल वनस्पतींचा वापर वाढत आहे. अशा वनस्पतींचा उपयोग औषधी निर्मितीमध्ये तसेच अन्य कामांमध्ये केला जातो.
Share your comments