मुख्य पिकातूनच शेतकऱ्यांना उत्पन्न भेटते असे नाही तर हंगामी पिकातून सुद्धा कमी कालावधीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न भेटते. हंगामी पिकांमध्ये मिरची, कांदा तसेच कलिंगड इत्यादी चा समावेश होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मसाला शेतीवर जास्त भर दिलेला आहे. हिरव्या मिरची मधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळतेच तसेच हिरव्या मिरचीमध्ये जीवनसत्त्व देखील अधिक असते त्यामुळे मिरची आरोग्यासाठी देखील चांगली असते. मिरची पासून बनवलेल्या मसाल्यांची निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात केली जाते जे की वर्षाकाठी मसाल्यांच्या निर्यातीमधून जवळपास २१ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होते तर नुसत्या मिरची निर्यातीतुन सुमारे ६ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होते. मागील वर्षी भारतामधून मसाला निर्यातीमधून सुमारे २७ हजार १९३ कोटी रुपयांच्या पुढे उलाढाल गेली होती.
मिरची निर्यातीमध्ये भारत अव्वल स्थानी :-
भारत देशात फक्त मिरची पिकाचे उत्पादन वाढले नाही तर सोबतच निर्यातही वाढली आहे. आंध्रप्रदेश राज्य हे मिरची उत्पादनात प्रथमस्थानी आहे. आंध्रप्रदेश राज्यातील मिरचीला चव, तिखटपणा तसेच मसाल्यासाठी अधिक वापर होत असल्याने जगभरात भारतीय मिरचीला अधिक पसंदी दिली जाते. गेल्या १० वर्षांपासून मिरची उत्पन्नात तसेच मिरची च्या दरामध्ये सुधारणा होत निघाली आहे. जागतिक मिरची व्यापारामध्ये भारतीय मिरचीचे ५० टक्के पेक्षा जास्त योगदान आहे. जरी चीन देशात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असले तरी तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकातील बेडगी मिरचीला अधिकची मागणी :-
कर्नाटक राज्यात जी मिरची पिकते ती बेडगी मिरची. बेडगी मिरचीच्या रंग आणि तिखटपणामुळे या मिरचीला जागतिक बाजारात मोठी मागणी आहे. आंधरप्रदेश राज्यात पुसा ज्वाला, सोना-21, जवाहर, सदाहरित, अग्नी, गुंटूर – प्रकासम – कृष्णा प्रदेशात उगवलेल्या ‘तेजा’ आणि ‘गुंटूर संनम या जातींच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भारतात कर्नाटक व मध्यप्रदेश ही राज्ये मिरची उत्पादनात अग्रेसर आहेत.
या आहेत मिरचीच्या सुधारित जाती :-
भारतात मिरचीच्या काही प्रगत जातींमुळे मिरची उत्पादनात वाढ झालेली आहे. उत्पादन वाढीबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे वाढले आहे. काशी अनमोल, अर्का सौफेल, अर्का लोहित, पुसा, ज्वाला या जातींचा यामध्ये समावेश आहे. काशी अर्ली, काशी सुरख, अर्क मेघना, अर्का श्वेता, अर्का आणि हरिता या मिरचीच्या संकरित जाती आहेत.
Share your comments