1. बातम्या

जागतिक चिमणी दिवस : काही दिवसात नष्ट होणार चिमण्यांचा चिव-चिवाट

चिमण्याच्या आवाजाने पूर्ण परिसर हसून उठत असतो. चिमण्याच्या चिव-चिवाटामुळे आपल्याला एक अल्हादायक वातावरणाचा अनुभव येत असतो. परंतु आज त्या चिमण्या या जगातूनच गायब होण्याच्या मार्गावर आहेत.

KJ Staff
KJ Staff


चिमण्याच्या आवाजाने पूर्ण परिसर हसून उठत असतो.  चिमण्याच्या चिव- चिवाटामुळे आपल्याला एक अल्हादायक वातावरणाचा अनुभव येत असतो. परंतु आज त्या चिमण्या या जगातूनच गायब होण्याच्या मार्गावर आहेत. आपण लहानपणी चिमण्याची गोष्ट ऐकली असेलच. गोष्टीतल्या चिऊ ताऊविषयी आपुलकी आणि प्रेम वाटू लागते. साधारण १४ ते १६ सेंटिमीटर असलेली नाजुकशी चिमणी आपल्याला नक्कीच आकर्षित करत असते. पण चिमण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने जागतिक स्तरावरील पर्यावरण व पक्षी प्रेमी चिंतेत आहेत.  

आज २० मार्च असून आज जागतिक चिमणी दिवस आहे. सर्वात पहिला दिवस २० मार्च २०१० मध्ये साजरा झाला होता. कबूतर आणि चिमण्या हे पक्षी मानवी वस्तीत जास्त आढळणारे पक्षी.  आपल्या घराच्या परिसरात दिसणाऱ्या चिमणीला हाऊस स्पॅरो म्हणतात. या चिमणीसह भारतात पाच प्रकारच्या चिमण्या आढळतात. पण या चिमण्या दिवसेंदिवस गायब होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे.

का गायब होत आहेत चिमण्या...

चिमण्या गायब होण्यामागे अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्या कारणांपैकी आहे की, तुमच्या आमच्या जवळ असलेला फोन. हो, आपल्याला अधिक इंटरनेटवाला मोबाईल फोन हवा असतो. सर्वाधिक मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये चीनच्या पाठोपाठ भारतचा क्रंमाक आहे. त्यासाठी अधिक लहरी असलेले मोबाईल टॉवर्स कंपन्या उभारत असतात. काही दिवसांपुर्वी रोबोट २.० हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हाच विषय मांडण्यात आला होता. मोबाईल टॉवरमुळे पक्ष्यांचा जीव कसा जात आहे, याच सुंदरपणे रेखाटणं या चित्रपटात करण्यात आले होते. माबाईल टॉवरमधून उत्पन्न होणाऱ्या लहरींमध्ये अंडी नष्ट करण्याची क्षमता असते. चिमण्याच्या संख्येत घट होण्यामागे हे एक महत्त्वाच कारण आहे. शास्त्रज्ञांच्या मते , अँड्रॉईड, आयफोन्स, यासारख्या अत्याधुनिक फोनमधून निघणारी किरणे नैसर्गिक जगावर परिणाम करत आहेत. 

वृक्षतोड : आपण आपल्या निवारासाठी किंवा इतर विकासाच्या कामासाठी वृक्षांची सर्रासपणे वृक्षतोड केली आणि अजून करत आहोत. यामुळे आपला तर निवारा झाला पण त्या वृक्षावर राहणाऱ्या पक्षांचे काय? आपण त्याविषयी अजिबात विचार करत नाहीत. वृक्षतोडीचा थेट घरट्यांवर विपरित परिणाम होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्याही घटत चालली आहे. संख्येत विलक्षण घट झाल्याने चिमण्यांना संकटग्रस्त प्रजातींच्या सूचित चिमण्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्य़ा चिमणीला विद्युत चुंबकीय उत्सर्जनाबरोबरच हवामान बदल आणि प्रदुषणाचा धोकाही वाढला आहे.

English Summary: world sparrow day : which causes kill to sparrow Published on: 20 March 2020, 04:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters