आज रोजी कृषी महाविद्यालय अकोलाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटद्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिन आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ श्यामसुंदर माने याचे मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संदीप लांबे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे, प्रभारी अधिकारी (शिक्षण) डॉ. गिरीश जेऊघाले, डॉ. गणेश भगत आणी इतर प्राध्यापका'चा समावेश होता. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम विषद केले आणि व्यसनाधीनते पासून स्वतःला दूर ठेवण्याचे आवाहन केले जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त श्री ऋतिक टाले व गोपाल उगले यांचे माध्यमातून सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मोठे निर्णय घेऊन ते अंमलात आणले यामुळे अहिल्याबाईं विषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. यामुळेच दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहाने साजरी केली जाते. आज त्यांची २९६ वी जयंती आहे. पती निधनानंतर त्यांच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय प्रांतात अंमलात आणणाऱ्या तसेच विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या. मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात करणाऱ्या. हुंडा बंदी, विनाकारण वृक्षतोड करण्याला तसेच जंगलतोडीला बंदी घालण्यासारखे मोठ मोठे निर्णय अहिल्याबाईंनी आपल्या प्रांतात घेतले.
अश्या प्रकारचे मत यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री अनिकेत पजई यानी मांडले तर युवकांनी कशा प्रकारे तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहायला हवे व त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम यावर गोपाल उगले यांनी मत मांडले, कु. अंजली ढोरे यांनी अहिल्याबाईचे शेतीविषयक धोरणात्मक विचार व्यक्त केले. सर्वात शेवटी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते
प्रतिनिधी- गोपाल उगले
Share your comments