मधमाशी हा आपल्याला सगळ्यांचा परिचयाचा कीटक आहे. मधमाशी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ते मधुर आणि रसाळ मध. मधमाशी ही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच अशा गोष्टींसाठी उपयुक्त आहे. परागीभवन या पिकांमधील महत्त्वपूर्ण कार्यात तिचा सहभाग महत्त्वाचा असतो. माणसांना अन्न हे वनस्पती पासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
मदा सारखे अमृत निर्माण करणार्या या कीटकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेन या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून मधमाशांच्या पालन आला अग्रक्रम देणे महत्वाचे आहे.
यात रोजगारनिर्मितीला वाव असल्याने हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. म्हणून मधमाशीला शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणून अशा उपयुक्त मधमाशीचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी वीस मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित करण्यात आला. आज आपण जागतिक मधमाशी दिवसाच्या निमित्ताने मधमाशांच्या काही प्रजाती विषयी माहिती घेणार आहोत.
-
मेगा पीस – उपप्रजाती मेगा पीस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही उंच झाडांवर, कड्यावर किंवा उंच इमारती वर एक किंवा अनेक पोळी बांधणारी जात असून ती अत्यंत आक्रमक असते. यांच्या पोळ्या मधील मद जर अधून मधून माणसाने काढण्याचा प्रयत्न केला तर या माशा उत्तेजित झाल्यावर माणसावर हल्ला करून मधमाशांच्या दंशाने व्यक्ती मृत्युमुखी पडू शकतो.
-
मिकऱ्या पीस – एपीस फ्लोरिया आणि एपीस अँड्रेणी फोर्मिस या दोन्ही मधमाशांच्या जाती एपिस प्रजातीच्या मेक्रिपीस या उपप्रजाती मधील आहेत या मधमाशांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लहान उघडे पोळे झुडपावर तयार करतात. या मधमाशांची नांगी लहान आकाराचे असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही.
-
एपीस मॅलिफेरा – ही मधमाशांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखडा याचा पूर्ण अभ्यास झाला आहे.उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली.
- आफ्रिकन मधमाशी – या माशांना किलर बी या नावाने देखील ओळखले जाते. युरोपियन मधमाशा आणि आफ्रिकेतील एपीस मेलिफेरा स्कुतेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. या प्रजातीची मधमाशी ही कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असते. या सहसा रोगांना बळी पडत नाहीत.
Share your comments