बांबूचे अनेक उपयोग तसेच याची वाढ सुद्धा वेगात होते आणि चांगली वाढ झालेला बांबू अनेक लहान बांबूना जन्म देतो त्यामुळे अनेक देशात बांबू लागवडीला पहिली पसंती आहे. जागतिक बांबू दिन दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. बांबूच्या फायद्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि दररोजच्या उत्पादनांमध्ये त्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डब्ल्यूबीडी २०२० च्या ११ व्या आवृत्तीची थीम 'बाम्बू आत्ता (BAMBOO NOW) आहे.
बांबू हा अनेक देशांतील ग्रामीण जीवनाचा भाग आहे, विशेषत भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये त्याच्या अष्टपैलू स्वभावामुळे आणि भरपूर वापरामुळे त्याला ‘गरीब माणसाचे लाकूड देखील म्हटले जाते. जरी ते झाडासारखे उंच वाढले असले तरी ते गवत वर्गात गणले जाते. बांबूचे इतके महत्व आहे ते दुष्काळ तसेच पुराचा सामना करू शकते. बांबूच्या विविधतेच्या बाबतीत भारत ,चीन नंतर दुसर्या क्रमांकावर आहे. जगभरात बांबूच्या जवळपास ५८ जाती आहेत.
बांबू हे भारतातील १० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पीक घेतले जाते आणि एकूण वनक्षेत्राच्या जवळपास १३ टक्के क्षेत्रावर बांबू आहे. बांबूचे एकूण उत्पादन दरवर्षी पाच दशलक्ष टन आहे. सुमारे ८.६ दशलक्ष लोक रोजीरोटीसाठी बांबूवर अवलंबून असतात. भारतातील बांबूचे मूल्य अंदाजे ४.४ अब्ज डॉलर्स आहे. यावरून आपण बांबूचे किती महत्व आहे हे समजू शकतो.भारतात बांबूचे मध्य प्रदेशात सर्वात मोठे क्षेत्र असूनही, पूर्वोत्तर भागात बांबूची संस्कृती वाढते आहे. कच्च्या बांबूच्या पोकळीत शिजवलेल्या तांदूळाला बरीच मागणी आहे आणि पूर्वोत्तर भागात लोकांच्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. घर बांधण्यापासून ते शेतीची उपकरणे पर्यंतच्या वस्तू बनविण्यात बांबूचा उपयोग केला जातो.
लागवडीनंतर बांबूच्या गठ्ठ्या सुमारे ४-७ वर्षानंतर चांगले उत्पन्न मिळण्यास मदत मिळते. छोट्या जमीनधारकांमध्ये हा कृषी वनीकरण पद्धतीचा भाग बनू शकतो. नवीन बांबूच्या लागवडीमुळे जंगलाची जीर्ण कमी होण्यासाठी मदत होते तसेच घनता वाढते. मातीची चांगली बांधणी करण्यास मदत होते बांबूचे तंतुमय मुळ माती धरून आणि जल संवर्धनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. २००७ मध्ये भारताने नॅशनल बांबू मिशन सुरू केले याचा बराच फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बांबू आणि रतन संघटना (INBAR) चे मुख्यालय चीनमध्ये आहे. ही एक बहुपक्षीय विकास संस्था आहे जी बांबू आणि रतन वापरून पर्यावरणीय शाश्वत विकासास प्रोत्साहन देते. जगभरातील कोट्यावधी लोकांच्या आणि वातावरणामध्ये वास्तविक बदल घडवून आणत आहे. तसेच ग्रीन पॉलिसी आणि टिकाऊ विकास उद्दीष्टांची माहिती देणे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. चीनच्या पावलावर पाऊल ठेवून भारताने नापीक उतारांमध्ये बांबूची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. साधारण झाडांपेक्षा ३५ टक्के जास्त ऑक्सिजन देणारी आणि वेगवान वाढणारी ही वनस्पती आहे. अभ्यासानुसार असे आढळले आहे, की बांबू प्रति हेक्टरपासून १२ टन कार्बन डाय ऑक्साईडवर नियंत्रण ठेवते. ओल्या हंगामात बांबूचा रोप दररोज एका फूटापर्यंत वाढतो. बांबू हा आपल्या जीवन आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कारण त्याचा उपयोग धार्मिक समारंभ, कला आणि संगीतामध्ये केला जातो. अशाप्रकारे ही एक गूढ वनस्पती आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान आहे.
Share your comments